मुंबई : एखाद्याच्या घोरण्याने शेजारी झोपणारे बेजार होतात. मात्र २ मिनिटात हे घोरणं बंद करता येईल असं दावा केला जातो. हा दावा किती खरा किती खोटा, हे पडताळण्यासाठी तसा खर्च नाहीय. म्हणून हा प्रयोग करून पाहता येण्यासारखा आहे.
गाईच्या दुधापासून बनवलेलं साजूक तूप जर तुमच्याकडे असेल, तर काही मिनिटात ही समस्या दूर होते असं म्हटलं जातं. अगदी सायनसवर देखील हा उपाय प्रभावी असल्याचं सांगतात. उपाय तसा सोपा असल्याने करण्यास हरकत नाही.
गाईच्या साजूक तुपाचे दोन-दोन थेंब रात्री झोपण्यापूर्वी नाकात टाका, हळूच ओढा, जास्त वेगाने तूप आत ओढल्यास उपयोग होत नाही.
मात्र तुम्ही हे गाईचं साजूक तूप नाकात व्यवस्थित टाकल्यास, घोरणं नक्की बंद होईल, असा दावा काही तज्ञ करतात. आता उपाय कमी पैशात आणि हानीकारक नसेल तर करून पाहायला हरकत नाही.
हे तूप टाकण्याआधी थोडंस कोमट करून घ्या. मग नाकात दोन-दोन थेंब टाका, हा उपाय रोज केल्यास सायनसवर देखील प्रभावी असल्याचं सांगण्यात येतं.