नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आज मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०१९ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला अधिकच महत्व आलं आहे. सर्वांच्या नजरा जेटलींच्या घोषणांकडे लागलं आहे. चला जाणून घेऊया त्यांचा आज दिवसभराचा कार्यक्रम....
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सकाळी अर्थ मंत्रालयाच्या अधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर ते राष्ट्रपती भवनासाठी रवाना होतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत भेट घेऊन अर्थसंकल्पाच्या एका कॉपीवर त्यांचे हस्ताक्षर घेतले जाईल. नंतर जेटली हे संसदेत येतील.
अर्थमंत्री अरूण जेटली संसदेत येईपर्यंत अर्थसंकल्पाच्या कॉपीज संसदेत सुरक्षित पोहोचतील. त्यानंतर कॅबिनेट बैठक घेतली जाईल. अर्थसंकल्प कॅबिनेट बैठकीत दाखवला जाणार याला कॅबिनेट या अर्थसंकल्पाला मंजूरी देणार.
कॅबिनेटकडून मंजूरी मिळाल्यानंतर काही वेळातच जेटली सभागृहात येतील आणि ११ वाजता अर्थसंकल्प लोकसभेत ठेवतील.
नंतर त्यांचं भाषण सुरू होईल. हे भाषण दोन तासांमध्ये संपेल असा अंदाज आहे. पण भाषण किती वेळात संपेल हे पूर्णपणे अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर निर्भर आहे.
अर्थमंत्री साधारण ४ वाजता पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे. पत्रकार परिषदेत ते पत्रकारांच्या प्रश्नांन उत्तरे देतील. आणि अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्देही सांगतील.