Couple Indecent Behaviour In Waterpark: सामान्यपणे उन्हाळ्यामध्ये वॉटरपार्कमध्ये लोकांची तुडुंब गर्दी पहायला मिळते. हल्ली तर पावसाळ्यामध्ये निघाणाऱ्या अनेक पिकनिकमध्येही रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल असेल याचा प्राधान्य दिलं जातं. अनेकजण तर पावसाळ्यामध्येही वॉटरपार्कला जातात. अनेकदा फार दूर जाण्याएवढ्या दिवसांचं नियोजन नसेल तर 'एक उनाड दिवस' वॉटरपार्कमध्येच घालवू म्हणत लोक सहकुटुंब वॉटरपार्कला जातात. तसं वॉटरपार्क म्हटल्यावर मुलांची मज्जा असते. मुलांबरोबर इतरही लोक नक्कीच इथे एन्जॉय करतात मात्र या ठिकाणी मुलांची वेगळीच मौज सुरु असते. पण वॉटरपार्क हे प्रामुख्याने लहान मुलांसाठी असतात याचा विसर अनेकदा लोकांना पडतो. सहकुटुंब फिरायला येणारे अनेकजण असलेल्या या ठिकाणीही काहीजण वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करतात.
असाच एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मे महिन्यामध्ये पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर अजूनही कमेंट्स येत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये काही जोडपी सार्वजनिक ठिकाणी लहान मुलं स्विमिंग पूलमध्ये असतानाही एकमेकांचं चुंबन घेताना दिसत आहेत. पाण्यामध्ये ही जोडपी आपल्या जोडीदाराबरोबर मुलांसमोरच अंगलट करताना व्हिडीओत पहायला मिळत आहे. या प्रेमीयुगुलांचे चाळे पाहून अनेकांनी तक्रार केल्यानंतर त्यांना समज देण्यात आली. मात्र त्यानंतर या जोडप्यांपैकी एका जोडप्याने अधिकच अश्लील गोष्टी स्विमिंग पूलमध्येच करण्यास सुरुवात केली.
हे जोडपं कुटुंबातील वेगवेगळ्या वयाच्या व्यक्ती स्विमिंग पूलमध्ये असताना त्यांच्यासमोरच एकमेकांचं चुंबन घेऊ लागलं. यामुळे आजूबाजूच्या लोकांना अवघडल्यासारखं झालं. काहींनी या जोडप्याला मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला. मात्र हे जोडपं कोणाचं काहीही ऐकण्यास तयार नव्हतं. हे दोघं एकमेकांशी अंगलट करत एकमेकांचं चुंबन घेत राहिले. स्विमिंग पूलमधील एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला. हाच व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज आहेत. जवळजवळ अडीच लाख जणांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. या व्हिडीओवर 8 हजारांहून अधिक कमेंट्स नोंदवण्यात आल्या आहेत. अनेकांनी अशाप्रकारे ही जोडपी सार्वजनिक ठिकाणी अश्लील प्रकार करत असल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. एकाने या जोडप्याला वॉटरपार्कमध्ये येण्याऐवजी एखाद्या हॉटेलमध्ये रुम बूक करायला हवी होती, असा खोचक सल्ला दिला आहे. अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी असं वागणं अगदीच चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.