मुंबई : सरकार गरीबांपर्यंत रेशन पोहचण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने (Ministry of Food and Public Distribution) वन नेशन वन राशन कार्ड (One Nation One Ration Card) अंतर्गत मेरा रेशन ऍप (Mera Ration App) लॉन्च केला आहे. सर्व लाभार्थ्यांना या अॅपचा लाभ मिळणार आहे. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी एकूण 32 राज्यात ''वन नेशन वन राशन'' लागू आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी 86 टक्के लोकं या योजनेंतर्गत येतात.
पण त्यासाठी तुमच्याकडे जर रेशकार्ड नसेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. आपण घरी बसून आपल्या स्मार्टफोनमधून ऑनलाईन (Apply online for ration card)रेशनकार्डसाठी अर्ज करू शकता. यासाठी सर्व राज्यांनी त्यांच्या वतीने वेबसाइट तयार केली आहे. आपण ज्या राज्यात राहातो तेथील वेबसाइटवर जा आणि रेशन कार्डसाठी अर्ज करा.
जो व्यक्ती भारताचा नागरीक आहे, तो रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो.
18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना पालकांच्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट केले जाते.
जे 18 वर्षांवरील आहेत ते स्वतःसाठी स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतात.
रेशन कार्ड बनावण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या राज्याच्या आधिकृत वेबसाईट वर जा.
तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये राहणारे नागरीक असाल तर https://fcs।up।gov।in/FoodPortal।aspx या वेबसाईवर जाऊन फॅर्म डाऊनलोड करा.
बिहारचे नागरिक असाल तर hindiyojana।in/apply-ration-card-bihar/ या वेबसाईवर जाऊन फॅर्म डाऊनलोड करा.
आणि महाराष्ट्रमध्ये रहाणारे नागरिक असाल तर mahafood।gov।in वर जाऊन फॉर्म डाऊनलोड करा.
त्यानंतर अप्लाय ऑनलाईन रेशन कार्डवर क्लिक करा.
रेशनकार्डसाठी अर्जाची फी 05 ते 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
पुढील पडताळणीनंतर, जर आपला अर्ज योग्य असल्याचे आढळले तर आपले रेशन कार्ड बनवले जाईल.
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, शासनाने दिलेला कोणताही आयकार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे डॉक्युमेंट्स रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी पुरावा म्हणून देता येईल.
याशिवाय पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, अॅड्रेस प्रूफ, वीज बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, भाडे करार हे कागदपत्रेही द्यावी लागतात.