Trending School Students Video : प्रत्येकाचं व्यक्तीमहत्त्व घडवण्यात शाळेचा खूप मोठा वाटा असतो. शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी आयुष्यभर अनेकांच्या अंगवळणी पडतात. समाजात राहण्याची प्रतिकृती शाळेतून शिकवली जाते. शाळकरी मुलांचे अनेक व्हिडीओ (Trending School Students Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक दुसरीतील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. (Trending mumbai School Students Activity Video of making bhel viral)
शाळेत शिवणाऱ्या लहान मुलांना नवनवीन गोष्टी शिकवण्यासाठी शिक्षक अनेकदा नाविन्यपूर्ण उपक्रम (School Students Activity) हाती घेताना दिसतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये देखील शिक्षकांनी एक भन्नाट उपक्रम विद्यार्थ्यांना शिकवल्याचं दिसतंय. सर्व विद्यार्थी रांगेत उभा राहून भेळचे साहित्य एका मोठ्या डब्यात टाकताना दिसतात.
एका विद्यार्थ्याने डबा आणला, तर दुसऱ्याने टोमॅटो, तर तिसऱ्याने कांदा, भाजलेले हरभरे, मटकी, विविध मसाले आणि इतर अनेक भाज्या एकामागोमाग एक विद्यार्थ्यांनी मोठ्या डब्यात टाकल्या. त्यानंतर एका विद्यार्थ्याने मस्त चवदार भेळला आणखी चटपटीत करण्यासाठी लिंबू पिळलं. तर शेवटच्या विद्यार्थ्याने त्यात चवीपुरतं मीठ टाकून भेळ (Bhel) बनवण्याचा कार्यक्रम पुर्ण केला.
व्हिडिओचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थी त्याच्या डबब्यात ठेवलेल्या साहित्याचे इंग्रजीमध्ये नाव घेतो आणि तो काय टाकत आहे ते सांगतो. हे सर्व विद्यार्थी मुंबईतील (Mumbai School) एका शाळेतील असल्याची माहिती समोर आली आहे.
सेक्यूरिटी गार्डने शक्कल लढवली अन् चोरट्यांचा डाव फसला; सीसीटीव्ही Video तुफान व्हायरल!
दरम्यान, चिमुकल्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. भेळ पुर्ण झाल्यानंतर सर्वांनी ही भेळ वाटून खालली. अनेकांना हा व्हिडीओ आवडला असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जातोय. तर अनेकांनी कमेंट करत शिक्षकांचं कौतूक केलंय.