Anil Deshmukh: माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. दरम्यान देशमुख यांनी यावर महत्वाचे विधान केले आहे. परमबीर यांनी माझ्यावर 100 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून चौकशी करायला सांगितले होते.आरोप झाल्यानंतर निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल यांच्या समितीने चौकशी केली. दीड वर्षापूर्वी हा अहवाल सरकारकडे दिला पण विधानसभेच्या पटलावर ठेवला नाही. हा अहवाल जनतेला कळला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
असे असले तरी हा अहवाल शेवटपर्यंत विधानसभेत ठेवला नाही. मी राज्यपाल यांना पत्र लिहिले होते. पण त्यांनीही यामध्ये लक्ष घातले नाही. पुढे आयोग नेमून त्याचा अहवाल पडून राहिला. त्याचा काय उपयोग? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुढील काळात शासनाने लवकरात लवकर समोर आणावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मी जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू झाली होती. ज्याचे नाव येणार होते त्याने स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरची हत्या केली. त्याचे मास्टरमाईंड परमवीर होते. सचिन वझे हा सुद्धा त्यात सहभागी होता. मी गृहमंत्री म्हणून परमवीर यांची बदली करत कारवाईचे आदेश दिले होते, असा खुलासा देशमुख यांनी केला.
वझेला काढून टाकण्याची कारवाई केली. म्हणून भाजपच्या नेत्यांनी त्यांना पुढे करून कारवाई करायला लावली. उच्च न्यायालयाने सुद्धा निरक्षण नोंदविले त्यात हवेत आरोप केले असे म्हटले.
ईडी सुप्रीम कोर्टात गेली होती. त्यांनी हाय कोर्टाचा निकाल तोच ठेवला त्यात मी निर्दोष आहे. सरकार जाणून बुजून हा अहवाल जनतेसमोर येऊ देत नाही. वेळ आली की त्या भाजप नेत्याचे नाव सांगेन, ते विदर्भातील आहेत असे अनिल देशमुखांनी म्हटले.
4 मुद्दे वेळ आल्यावर सांगेल. मी 100 टक्के पक्ष माझ्यासोबत आहेहे सर्व प्रकरण आमच्या नेत्यांना माहिती होते. खोटे आरोप करायला लावले हे माहिती होते, असे ते म्हणाले. 3 वर्षांपूर्वी माझ्यावर आरोप झाला तेव्हा प्रयत्न झाला. विरोधी लोकांनी माझ्याकडे माणसे पाठविली होती. त्यांनी अॅफिडेव्हिट करून दिले असते तर माझ्यावर ईडी लागली नसती. सीबीआय लागली नसती. पण त्यामध्ये पक्षाच्या नेत्याला अडचणीत आणणारे मुद्दे होते. इतके धक्कादाय मुद्दे होते की त्याच दिवशी सरकार पडले असते. त्यावेळेस मी पळून गेलो असतो पण त्यापेक्षा मी जेलमध्ये जाण्याचा पर्याय निवडला. याबद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना माहिती होते
परमवीर यांना 6 समन्स पाठविले. त्यांच्यावर अटक वॉरंट निघाल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशात असेच सुरू आहे. राजकीय विरोध यांची मुस्कटदाबी कशी करायची यासाठी यंत्रणेचा वापर सुरू आहे. कुणाला अॅफिडेव्हिट द्यावे लागले माहिती नाही पण मला द्यावे लागले असते, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक प्रचारात पेनड्राइव्ह दाखवू. 100 कोटींचा आरोप झाला पण 1 कोटी 71 लाखावर चार्जशीट दाखल केले. पण त्याचेही पुरावे कोर्टासमोर दाखवू शकले नाहीत, असे देशमुख म्हणाले. चांदीवाल अहवाल समोर येऊ देत. वेळ आली तर मी कोर्टात जाईलयोग्यवेळी पेनड्राइव्ह मध्ये काय आहे हे सांगेल, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी जागावाटप वादावर त्यांनी भाष्य केले. उमेदवार कोण निवडून येईल याचा विचार आम्ही करतोय. तिन्ही पक्ष याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतील. कुणाला किती संख्या हा मुद्दा नाही पण जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीबाबत वरीष्ठ नेते चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.