Maharashtra IAS Transfer : महाराष्ट्रात बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच आहे. महाराष्ट्र सरकारने 11 फेब्रुवेरी रोजी 4 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. मागच्या 40 दिवसात 27 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यामुंळे प्रशासकीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनात देखील फेरबदल पहायला मिळत आहेत. 2 जानेवारी 2025 रोजी 10 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. 4 फेब्रुवारी 2025 रोजी एकाचवेळी 13 IAS अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर आज 11 फेब्रुवारी रोजी चार अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
डॉ कुणाल खेमनार, आयुक्त साखर, पुणे यांची बदली जॉइंट सीईओ एमआयडीसी, मुंबई येथे करण्यात आली आहे. डॉ मंतदा राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली यांची जॉइंट एमडी सिडको नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. अशोक काकडे एमडी सारथी यांची जिल्हाधिकारी सांगली येथे बदली करण्यात आली आहे. अनमोल सागर सीईओ झेडपी लातूर यांची बदली मनपा आयुक्त भिवंडी निजामपूर बहुविध महामंडळात करण्यात आली आहे.
4 फेब्रुवारी 2025 बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी
- प्रवीण दराडे प्रधान सचिव, (सहकार आणि विपणन), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- पंकज कुमार यांची सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- नितीन पाटील सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्वेता सिंघल महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिव यांची अमरावती विभागातील विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. प्रशांत नारनवरे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव, मलबार हिल, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- अनिल भंडारी सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई यांना संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- पी.के. डांगे आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांना सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- एस. रामामूर्ती सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे उपसचिव, मलबार हिल, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे.
- अभिजित राऊत जिल्हाधिकारी, नांदेड यांना सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- मिलिंद कुमार साळवे सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर यांची आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- राहुल कर्डिले सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- माधवी सरदेशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली यांना संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- अमित रंजन सहाय्यक जिल्हाधिकारी, चार्मोशी उपविभाग, गडचिरोली यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
2 जानेवारी 2025 रोजी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी
1) जयश्री भोज यांची महाआइटी येथून अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
2) साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांची पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
3) विनिता वेद सिंघल, प्रधान सचिव, कामगार यांची प्रधान सचिव, पर्यावरण, म्हणून नियुक्ती झाली आहे.
४) आय ए कुंदन, एसीएस स्कूल एज्यु. प्रधान सचिव, कामगार म्हणून नियुक्ती
5) मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव, वने आणि महसूल
६) वेणुगोपाल रेड्डी, एसीएस फॉरेस्ट, एसीएस, हायर आणि टेक.एड्यु.
७) निपुण विनायक, रुसा सचिव, पब हेल्थ
8) संतोष पाटील, सीईओ जि.प. पुणे यांची जिल्हाधिकारी, सातारा
9) हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव, सामाजिक न्याय
10) विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण. प्रधान सचिव, कृषी म्हणून नियुक्ती.