मुंबईत कोरोनाचे 24 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 129 वर पोहोचली आहे. मुंबईत 25 पैकी 3 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जेएन वन व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच राज्यातही कोरोनाचा उद्रेक सुरुच झाला आहे. आज राज्यात 129 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण 479 कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नवीन वर्ष सेलिब्रेशनवर यंदा कोरोनाची टांगती तलवार आहे. राज्यात कोरोनाचे 117 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 369वर पोहोचलीये. धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झालाय. त्यामुळेच आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. पुढचे 10-15 दिवस आरोग्य यंत्रणेनं आणि नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केलं आहे.
इन्कोव्हॅक (iNCOVACC) कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण केंद्रांची यादी- दिनांक २९ डिसेंबर २०२३
---
The list of COVID-19 iNCOVACC Vaccination Centers- Date 29 December 2023 #CovidVaccines #COVID19Vaccine #COVIDVaccination #COVID19Vaccination pic.twitter.com/n8Y9HQB9Q3— Public Health Department (BMC) (@mybmchealth) December 28, 2023
राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन करण्यात आलीय. या टास्क फोर्सनं सतर्कतेचा इशारा दिलाय.. सुट्टया तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन आणि धार्मिक स्थळावंर गर्दी होते.. त्यातून कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होऊ शकतो अशी भीती वर्तवण्यात येतेय. कोरोनापासून वाचवण्यासाठी काय काळजी घ्याल..
कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.. त्यामुळे घाबरु नका, मात्र काळजी घ्या...