Thane Borivali Tunnel : ठाणे ते बोरिवली हा प्रवास आता फक्त 12 मिनिटांत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गाची पायाभरणी करण्यात आली. त्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवासात 1 तासांची बचत होणार आहे.. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचा हा 16 हजार 600 कोटींचा प्रकल्प आहे. त्यामुळे थेट कनेक्टिव्हिटी मिळेल.
ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गामुळे घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होईल आणि या क्षेत्राच्या वाढीस चालना मिळेल असा अंदाज आहे.. भारतातील हा सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग आहे. प्रकल्पाची एकूण लांबी 11.8 किमी आहे, त्यापैकी 10.25 किमीचा बोगदा आहे. दोन्ही बोगद्यांमध्ये दोन मार्गिका आणि एक आपत्कालीन मार्गिका असणार आहे.. त्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास विनाथांबा आणि सिग्नलरहित करता येणार आहे..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील कामांवरून विरोधकांना सुनावलं
दहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये फक्त 8 किमीचं मेट्रोचं जाळं होतं...आता 80 किमी मेट्रो धावते आहे...त्याचबरोबर कोस्टल रोडबाबत अफवा पसरवण्याचं काम विरोधकांनी केलं...पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील कामांवरून विरोधकांना सुनावलं...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत 29 हजार 400 कोटींच्या नव्या प्रकल्पांची पायाभरणी
महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुंबईत केली.. पंतप्रधान पदाची तिस-यांदा शपथ घेतल्यानंतर मोदी आज पहिल्यांदाच मुंबईत आले होते.. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी 29 हजार 400 कोटींच्या नव्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली.. मुंबई शहर वेगवान होण्यास या प्रकल्पांमुळे फायदा होणार असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलंय.
पंढरीच्या विठुरायाला कोटीकोटी नमन करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत...त्याचबरोबर 200 किमीचा संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग पूर्ण झाला असून...संत तुकाराम पालखी मार्गही 110 किमी पूर्ण झाला असून लवकरच हे दोन्ही मार्ग प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील...तिस-यांदा पंतप्रधान झाल्यानंतरन नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले...राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचं मुंबईमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते...