मुंबई : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत यावरून सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र याबाबत निर्णय झाला असला तरी त्यावर हरकती मागवल्या आहेत. अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar on sell wine in the supermarket)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत बोलताना म्हटलं की, एक्साईज माझ्याकडे आहे. मात्र मी जन्माला आल्यापासून एक ही थेंब त्याचा घेतला नाही. आपल्याकडे दारुला ३०० टक्के टॅक्स होता तो आपण १५० केला. दिल्लीत कर कमी होता म्हणून अनेकजण दिल्लीला गेले की दोनही हातात दारु घेऊन यायचे. अजून वाईन सुरु झाली नाही. हरकती आपण मागविल्या आहेत. अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा आमचे मंत्री आणि अधिकारी त्यांना भेटायला गेले होते.
राज्यात किराना दुकानात वाईन विक्री निर्णय अजून नाही. साधारण राज्यात तीनशे दुकाणात परवानगी द्यायचा विचार आहे. वाईन पिल्यानंतर गाडी चालवली तर कारवाई होणारच आहे.
सूपर मार्केट मांसाहार असणारे भागात शाकाहारी जात नाही, तसच वाईन बाबत होईल. ज्याला प्यायची तो कोठे ही जातो तो बरोबर शोधतो दारू दुकाण कोठे आणि रात्री झिंगत येतो. सुपर मार्केट मध्ये मटन चिकन आणि मासे असतात. माळकरी तीकडे वास आला की जात नाही. तसंच वाईनचं असणार आहे. एखाद्या पेताडाला कुढून ही मिळते. तो एखाद्या गावात गेला तर त्याला बरोबर ते दुकान सापडतं.' असं ही अजित पवार म्हणाले.