Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने भाजपशी (BJP) हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. पुढची अडीच वर्ष शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis Government) सरकार एकत्र काम करणार आहे. पण या नव्या सरकारला 10 दिवस होत नाहीत तोच शिंदे गट आणि भाजपात खडाजंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याला कारण ठरतंय शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यातील वाद.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपूत्र आणि भाजप नेते निलेश राणे ठाकरे घराण्यावरची टीका बंद करावीत, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं, यावर निलेश राणे यांनी केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरु नका असं सांगत इशार दिला. त्यावर आत केसरकर यांनी निलेश राणे यांची लायकीच काढली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचं सरकार महाराष्ट्रात बनलं आहे. त्यामुळे राणे पुत्र आणि किरीट सोमय्या यांनी ठाकरे घराण्यावरची टीका थांबवावी असं दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं. किरीट सोमय्या यांनी अशी टीका करणार नसल्याचा शब्द दिला आहे, तर नारायण राणे यांची मुलं लहान आहेत, देवेंद्र फडणवीस यांना सांगून आम्ही त्यांनाही समजावू असं केसकर यांनी म्हटलं होतं.
निलेश राणे यांचं केसरकर यांना उत्तर
दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याला निलेश राणे यांनीही उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विट करत केसरकर यांच्यावर टीका केली, आपल्या ट्विचमध्ये निलेश राणे यांनी म्हटलंय, दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात, हे विसरू नका, असा इशारा निलेश राणे यांना दिला.
दीपक केसरकर यांचा पलटवार
आता दीपक केसरकर यांनी पुन्हा पलटवार केला आहे. निलेश राणे हे वारंवार उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात, भाजपकडून ठाकरे घराण्यावर कोणीही टीका करणार नाही. असं आमच ठरलं आहे, त्यांनी दहा वेळा टीका केली तर मी दहा वेळा बोलणार, माझ्या वयाच्या निम्म्या वयाची राणे यांची मुलं आहेत.म्हणून मी त्यांना लहान म्हटलं आणि मला तसं म्हणण्याचा अधिकार आहे, असं सांगत केसरकर यांनी राणे यांना कोकणी जनतेने त्यांची यापूर्वीच लायकी दाखवली आहे अशी बोचरी टीकाही केली आहे.