मुंबई : उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर घटनेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. लखीमपूर घटनेत दिसून आलं शांतपणे चाललेल्या लोकांवर गाडी घालून हत्या केली जाते, असा प्रकार कधी घडला नव्हता. तो प्रकार झाल्यानंतर तिथल्या शेतकर्यांनी सांगितले केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचे चीरंजीव त्या गाडीत होते. पण याबाबत सरकारने काही केले नाही. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप केला तेव्हा अटक करण्यात आली असं शरद पवार यांनी म्हटलं.
लखीमपूरचा प्रश्न उपस्थित केल्यावर राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनी विचारलं मावळमध्ये काय घडलं. मावळमध्ये शेतकरी मृत्युला जबाबदार राजकीय पक्षाचे लोक नव्हते, तर तो आरोप होता पोलीसांवर होता, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मावळमध्ये शेतकऱ्यांमध्ये पोलीस गोळीबार झाला तेव्हा सत्ताधारी पक्षाबद्दल नाराजी होती. पण आता लोकांना समजून आलं ही परिस्थिती तेव्हा चिघळावी यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी चिथावणी दिली होती असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
पुणे जिल्ह्यात जनसंघ आणि आताचा भाजप सातत्याने निवडून येत होता. पण त्याच मावळमध्ये गोळीबाराच्या काळात लोकांना भटकण्याचे काम कुणी केले हे लोकांच्या लक्षात आलं. त्याच मावळमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार 90 हजार मतांनी निवडून दिलं, त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांनी मावळचा उल्लेख केला ते बरे केलं, अशी टीका शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मावळच्य घटनेवरुन शरद पवार यांनी केलेल्या आरोपाला भाजपने उत्तर दिलं आहे. पवारांनी मावळचा उल्लेख केला, त्यावेळी पालकमंत्री अजित पवारच होते. मावळचं खापर पोलिसांवर फोडायचं असं दुर्दैवी काम सत्ताधारी पक्षाकडून होताना दिसतंय असं प्रत्युत्तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिलं आहे. मावळला त्यांचा विजय झाला यांचे उमेदवार भाजप मधूनच गेलेले होते. पण घरचा उमेदवार पार्थ पवार यांची 41 हजार ची पिछाडी होती, त्यात राष्ट्रवादीच्या जागा, भाजपच्या जागा याचं मुल्यमापन करता आलं नाही असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.