Mumbai News : BMC कडून मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर; 'या' भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा

Mumbai News : मान्सूनच्या तोंडावर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून पालिकेकडून महत्त्वाची पावलंही उचलली जात आहेत.   

सायली पाटील | Updated: May 8, 2024, 09:47 AM IST
Mumbai News : BMC कडून मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर; 'या' भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा  title=
Mumbai news before Monsoon BMC Releases List Of 188 Dangerous Buildings Check Details Inside

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : (Mumbai News) पावसाळा तोंडावर आला, की मान्सूनपूर्व कामांना वेग येतो. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी ही (Mumbai Monsoon) मान्सूनपूर्व कामं हाती घेण्यात येतात. यामध्ये रस्त्यांच्या पाहणीपासून अगदी इमारतीचीं पाहणी आणि संबंधित कामांचाही समावेश असतो. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं यंदाच्या वर्षीचा पावसाळा सुरु होण्यापूर्वी धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करण्यात आलं असून, त्याआधारे पालिकेनं जवळपास 188 इमारती अतिधोकादायक असल्याचं सांगत एक यादी जारी केली आहे. 

यंदाच्या वर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई शहरातील 188 इमारती अतिधोकादायक असल्याचं निदर्शनास आलं आहे.  या इमारतींमध्ये सर्वाधिक, तब्बर 114 अतिधोकादायक इमारती मालाड, बोरिवली, मुलुंड, अंधेरी पश्चिम या भागांमध्ये म्हणजेच शहराच्या पश्चिम उपनगरात आहेत. तर, मुंबई शहरात 27 आणि पूर्व उपनगरात 47 इमारतींची नोंद पालिकेनं केली आहे. 

दरम्यान, धोकादायक इमारतींचा आकडा मागील काही वर्षांच्या तुलनेक मोठ्या फरकानं कमी झाला आहे. पाच वर्षांपूर्वी धोकादायक इमारतींची संख्या 619 इतकी होती. पण, यापैकी बऱ्याच इमारती पाडल्या असल्यामुळं हा आकडा 188 वर पोहोचला आहे. 

कशा ओळखल्या जातात अतिधोकादायक इमारती? 

- इमारतीच्या तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणं, कॉलममधील काँक्रिट पडणं, इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखं भासणं, कॉलमला भेगा पडणं
- इमारतीचे बीम झुकल्यासारखं वाटणं, इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणं, इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत बदल दिसणं
- इमारतीच्या आर.सी.सी. चेंबर्स आणि विटांची भिंत यात भेगा दिसणं किंवा त्यांचं काँक्रिट पडणं, इमारतीत काही विशिष्ट आवाज होणं 

वरीलपैकी कोणतीही लक्षणं किंवा तत्सम गोष्टी आढळल्यास त्या इमारती धोकादायक असून, नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणत पालिकेच्या सूचनांनुसार इमारत तातडीनं रिक्त करणं गरजेचं असतं. सोबतच आजुबाजूच्या इमारतींना याबाबतची सूचना दिली जाणंही आवश्यक ठरतं.

Mumbai news before Monsoon BMC Releases List Of 188 Dangerous Buildings Check Details Inside

Mumbai news before Monsoon BMC Releases List Of 188 Dangerous Buildings Check Details Inside

Mumbai news before Monsoon BMC Releases List Of 188 Dangerous Buildings Check Details Inside

Mumbai news before Monsoon BMC Releases List Of 188 Dangerous Buildings Check Details Inside

 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय? 

पालिकेकडून करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये इमारतींची विभागणी केली जाते. सी 1, सी 2 आणि सी 3 अशा गटांमध्ये ही विभागणी केली जात असून त्यामध्ये अनुक्रमे पहिल्या गटातील इमारती अतिधोकादायक, दुसऱ्या गटातील इमारतींना दुरुस्तीची गरज तर, तिसऱ्या गटातील इमारतींना किरकोळ दुरूस्तीची गरज असते. BMC च्या वतीनं गटानुसार इमारतीतील रहिवाशांना अनुसरून नोटिस बजावण्यात येते.