मुंबई : अनिल देशमुख यांना फसवलं गेलंय, आरोप लावणारे परमवीर सिंग फरार आहेत. ही सगळी राजकीय कारवाई असून सरकारला बदमान करण्यासाठी आता अनिल परब यांचा नंबर असे म्हणत आहेत. हे नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. परमबिर सिंग पळाले की पळवून लावले ?असा सवाल देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत विचारला आहे.
जसमीन वानखेडे यांचे एक व्हाट्सएप chat माझ्याकडे आहे. लेडी डॉन या वसुलीच्या धंद्यात सहभागी आहे. वानखेडेवर कारवाई होणार त्या दिवशी लोक समोर येऊन बोलणार. लोकांनी समोर यावे आणि बोलावे. एवढंच नव्हे तर नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप देखील केले आहेत. 'माझ्या जावायाकडे वि वि सिंग, एन सी बी अधिकारी यांनी land क्रूझर गाडी मागितली, असा गौप्य स्फोट देखील त्यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या यंत्रणा संस्थांचा वापर करून राज्याला बदनाम भाजपकडून केले जात आहे. जे बंगालमध्ये सुरू होते ते महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपात गेलेले लोक म्हणतात आम्हाला आता सुखाची झोप लागते, असा खोचक टोला देखील नवाब मलिकांनी लगावला आहे.
गेल्या २६ दिवसात दोन महिलांची फक्त नाव घेतली कारण त्या विषयाशी संबंधित होत्या. पण महिला मुद्द्याला घेऊन काही लोक मला प्रश्न विचारत आहेत. पण किरीट सोमय्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पत्नीचे नाव घेतात,संजय राऊत यांच्या पत्नीचे नाव घेतात,खडसे यांच्या पत्नीचा उल्लेख करतात मग या महिला नाहीत का? की यांच्या महिला फक्त महिला, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. (देवेंद्र फडणवीसांनी फटाके फोडण्यासाठी दिवाळीपर्यंत वाट बघू नये - नवाब मलिक)
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांनी सोमवारी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावेळी फडणवीस म्हणाले की,'दिवाळी आधी लवंगी फोडू मोठा आवाज करण्याचा नवाब मलिकांचा प्रयत्न आहे. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी त्यांनी माझ्याशी बोलू नये. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो ट्विट केला. दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फो़डेन, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांना इशारा दिला आहे.'