मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास आर्थिक गैरव्यवहार (Patra Chal scam) प्रकरणी न्यायालयीन अटकेत असलेल्या शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राऊतच असल्याचा ईडीचा आरोप आहे. दरम्यान या सुनावणीवेळी संजय राऊत हे न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 10 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयात संजय राऊत यांच्या वकिलाने जामिनावर युक्तिवाद पूर्ण केला. ईडीकडून युक्तिवाद करणयासाठी पुढची तारीख मागण्यात आली. त्यानुसार न्यायालयान 10 ऑक्टोबबर ही पुढची तारीख दिलेली आहे. न्यायालयाने 10 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणातील सुनावणी तहकूब केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा यंदाचा दसरा हा न्यायालयीन कोठडीचत (Judicial Custody) जाणार आहे. (Patra Chal scam Sanjay Rauts Judicial Custody Matter adjourned till 10th October)
Maharashtra | Hearing on Shiv Sena MP Sanjay Raut's bail plea underway at Special PMLA Court; Raut present for the hearing. pic.twitter.com/7jXVx8nRTi
— ANI (@ANI) September 27, 2022
पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांनी या अगोदर जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर राऊतांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली होती. यावेळी ईडीला जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र पुन्हा सुनावणीवरील कारवाई पूर्ण होऊ न शकल्याने न्यायालयाने सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली होती.
पत्राचाळ गैरव्यवहारातील एक कोटी सहा लाख रुपये प्रवीण राऊत यांच्यामार्फत संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप ईडीने केला होता.