'बिग बी' विरोधात ऑस्ट्रेलियात तक्रार

बिग बी अमिताभ बच्चनविरोधात ऑस्ट्रेलियामध्ये तक्रार नोंदविली आहे. अमेरिकेतील शीख मानवाधिकार संघटनेने १९८४ मध्ये शीख समुदायाविरोधी झालेल्या दंगलीला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी ही तक्रार दाखल केली आहे.

Updated: Oct 19, 2011, 10:45 AM IST

झी २४ तास वेब टीम, न्यूयॉर्क

बिग बी अमिताभ बच्चनविरोधात ऑस्ट्रेलियामध्ये तक्रार नोंदविली आहे. अमेरिकेतील शीख मानवाधिकार संघटनेने १९८४ मध्ये शीख समुदायाविरोधी झालेल्या दंगलीला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी ही तक्रार दाखल केली आहे.

शीख फॉर जस्टीस या संघटनेने ऑस्ट्रेलियामधील राष्ट्रमंडळ जन अभियोजनचे निर्देशक क्रिस्टोफर क्राईगी यांच्याकडे हा गुन्हा दाखल केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या गुन्हा अधिनियम १९९५ च्या अंतर्गत ही तक्रार नोंदविण्यात आली असून, ऑस्ट्रेलियातील न्यायालयात मानवते विरुध्दच्या गुन्ह्याच्या सर्व घटनांत विशेष अधिकार आहेत.

दरम्यान ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बनमधील क्विन्सलँड विद्यापीठ अमिताभ बच्चन यांना गुरुवारी मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करणार आहे. त्यामुळे बिग बी अडचणीत आले आहेत. बच्चन सध्या सिडनीमध्ये आपल्या द ग्रेट गॅट्सबाय या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यामध्ये बच्चन यांच्या समवेत टायटॅनिक या चित्रपटाचा अभिनेता लियोनार्डो दी कॅपरियो हा आहे.