मुंबई : रोज सकाळी अनेकांच्या नाश्त्यामध्ये ब्रेड हा असतोच. अनेक जण ब्रेड खातात. पण आता हे तुम्हाला धोकादायक ठरु शकतं. सेंटर फॉर सायन्स अँड एन्वायरन्मेंटने एक रिपोर्ट जाहीर केला आहे ज्यामध्ये ब्रेडपासून तयार होणारे पिज्जा, बर्गर सारखे ३८ प्रसिद्ध ब्रॅन्ड फेल झाले आहेत. ८४ टक्के सॅम्पलमध्ये २ बी कार्सिनोजेन कॅटेगरीचं कॅन्सर आढळलं आहे ज्यामुळे महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर सारखा भयंकर आजार होऊ शकतो.
पोटेशियम ब्रोमेटमुळे कॅन्सर होतो. अनेक प्रसिद्ध ब्रॅन्ड ब्रेडचं उत्पादन करतांना पोटेशियम आयोडेटचा वापर करतात ज्यामुळे थाईरॉइड सारखा गंभीर आजार होतो. यामुळे पोट दुखी, उल्टी आणि किडनी खराब होण्यासारखे गंभीर आजार होतात.