नवी दिल्ली :काळ्या पैशांच्या मुद्यावर सरकार आज दुपारी १२ वाजता सुप्रीम कोर्टात प्रतिक्षापत्र सादर करणार आहे, टाइम्स नाऊ या इंग्रजी न्यूज चॅनेलने केलेल्या दाव्यानुसार, प्रतिक्षापत्रात सरकार अशा ३ जणांचं नाव घेणार आहे, ज्यांची खाती स्विस बँकेत आहेत.
'टाइम्स नाऊ'ने दिलेल्या बातमीनुसार तीन काळ्या पैशांच्या मुद्यावरून तीन नावं सरकारने कोर्टात दिलेली आहेत. या खातेदारांमध्ये डाबरचे प्रदीप बर्म, राजकोटचे उद्योजक पंकज चमनलाल लोढिया यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच गोव्यातील खाण उद्योजक राधा टिम्ब्लू यांचं नावही सरकारने प्रतिक्षापत्रात दिलं आहे.
मात्र यात अजुनही कुठेही राजकीय नावांचा समावेश असल्याचं दिसून आलेलं नाही. सर्वच नावं का जाहीर होत नाहीत, असा प्रश्न आता उपस्थित होणार आहे, यूपीएनेही सर्वच नावं जाहीर केली नव्हती, त्याप्रमाणे नरेंद्र मोदी सरकारही सर्वच नावं जाहीर करणार नाही का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकारचे वकील एटर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलंय की, दुपारी १२ वाजता काळ्या पैशांवर प्रतिज्ञापत्र दाखल केलं जाणार आहे. मात्र अजुनही हे स्पष्ट झालेलं नाही की, सरकार काळ्या पैशांवाल्यांची नावं सांगणार आहे की नाही.
टाइम्स ऑफ इंडियाची बातमी
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार प्रतिज्ञापत्रात सरकार तीन लोकांचं नाव घेण्याची शक्यता आहे, ज्यांचे पैसे स्विस बँकेत आहेत, पहिल्यांदा बातमी होती की, सरकार १३६ लोकांची नावं सुप्रीम कोर्टात सांगणार आहे. ही तीन नावं अशी आहेत, ज्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र कोणत्याही चौकशीशिवाय कुणाचंही नाव घेतलं जाणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.