पूर्ती गैरव्यवहार: माझ्यावरील सर्व आरोप राजकीय, गडकरींचा खुलासा

पूर्ती गैरव्यवहार संबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेत निवेदन दिलय.  कॅगच्या अहवालात आपल्याविरोधात काहीही नसल्याचं स्पष्टीकरण गडकरींनी त्यांनी सांगितलय.

Updated: May 11, 2015, 04:23 PM IST
पूर्ती गैरव्यवहार: माझ्यावरील सर्व आरोप राजकीय, गडकरींचा खुलासा title=

नवी दिल्ली: पूर्ती गैरव्यवहार संबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेत निवेदन दिलय.  कॅगच्या अहवालात आपल्याविरोधात काहीही नसल्याचं स्पष्टीकरण गडकरींनी त्यांनी सांगितलय.

आपल्यावर जे आरोप होतायेत ते राजकारणाने प्रेरित असल्याचं त्यांनी म्हटलंय.. तर काँग्रेसनं गडकरींच्या राजीमान्याची मागणी करत राज्यसभेत गोंधळ घातला. गोंधळानंतर राज्यसभेचं कामकाज काही काळ स्थगित करण्यात आलीय.
 
'कॅग'च्या अहवालात माझ्याविरोधात काहीही नाही. माझ्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. जे आरोप आहेत, ते सर्व राजकीय हेतून प्रेरित आहेत. पूर्ती उद्योग समूहाने कोणतीही अफरातफरी केली नाही. तसंच त्यामध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही", असा दावा गडकरींनी राज्यसभेत केला.
 
नितीन गडकरी भाजप अध्यक्ष असताना पूर्ती उद्योग समूहाला मिळालेल्या कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमीतता झाल्याचे ताशेरे 'कॅग'नं ओढले होते. याशिवाय पूर्ती उद्योगसमूहाने केंद्राची सबसिडी मिळवताना काही नियमांचं उल्लंघन केल्याचं कॅगनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.