नवी दिल्ली : कर चुकवेगिरीला चाप बसवण्यासाठी इनकम टॅक्स कार्यालायाने कडक धोरण अवलंबले आहे. आता इनकम टॅक्स रिटर्न अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणे बंधन कारक असणार आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) नी इनकम टॅक्स भरण्याच्या फॉर्मवर एक नवा कॉलम ठेवला आहे. ज्यात करदात्यांनी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे, तसे आयकर विभाग कार्यालयने स्पष्ट केले आहे.
आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, करदात्यासंबंधित काही माहिती देणे तसेच घेण्याबाबत रिटर्न अर्जावर मोबाईल नंबर व ईमेल आयडी असल्यास त्यांच्याशी संपर्क साधणे सोपे जाईल. तसंच वेळेवर रिफंड सुनिश्चित करण्यासाठीही मदत होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.