नवी दिल्ली : रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी रेल्वेने आता पुढाकार घेतला आहे. रेल्वे दुर्घटनेत मृत्यू किंवा कोणी प्रवासी जखमी झाला तर त्याला आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, रेल्वे स्वत:च्या खिशातील पैसे देणार नाही तर विमा कंपनी ही मदत देणार आहे.
रेल्वेने एलआयसीबरोबर एक करार केलाय. रेल्वे प्रवाशांने तिकीट काढल्यानंतर त्याचा विमा उतला जाणार आहे. कोठे दुर्घटना झाली तर दुर्घटनाग्रस्त प्रवाश्याला विमा कंपनी नुकसान भरपाई देणार आहे. ही योजना पायलेट प्रोजेक्ट म्हणून पहिला राबविण्यात येणार आहे. शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रथम ही सुविधा सुरु होणार आहे.
मात्र, याचा प्रारुप आराखडा तयार होयचा आहे. रेल्वे बोर्डचे सचिव प्रदीप कुमार यांनी अशा कराराबाबत दुजोरा दिला आहे. दिल्लीत होणाऱ्या ९ आणि १० ऑक्टोबरच्या बैठकीत ही बाब सार्वजनिक केली जाईल. बैठकीनंतर किती विमा उतरवला जाईल, किती पैसे जमा होतील, याबाबत माहिती दिली जाईल. प्रत्येक वेळी विमा काढला जाणार आहे का, विमा उतरविण्यात येणार असल्याने रेल्वे तिकीट महाग होणार का? याबाबतच्या प्रश्नांवर बैठकीनंतर उत्तर दिले जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.