मुंबई : नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे ओढावलेल्या संकटानंतर आपतग्रस्तांना 'बिईंग ह्युमन'तर्फे कोणत्याही पद्धतीची मदत करण्यात आलेली नाही, असं सिनेस्टार सलमान खाननं स्पष्ट केलंय.
कोर्टामध्ये स्वत:ला 'इंडियन' म्हणणाऱ्या सलमानच्या म्हणण्यानुसार आपली एनजीओ 'बीईंग ह्युमन' केवळ भारतात काम करते. नेपाळमध्ये ओढावलेल्या नैसर्गिक संकटानंतर नेपाळला आपण आणि बिईंग ह्युमननं कोणतीही मदत केलेली नाही. बीईंग ह्युमननं नेपाळच्या भूकंपग्रस्तांना मदतीसाठी पैसे दान दिल्याच्या काही खोट्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या बातम्या खोट्या आहेत, असं सलमाननं आपल्या फेसबुक अकाऊंटवरून दिलीय.
There are rumors about Being Human donating money for the Nepal earthquake. This is NOT TRUE as Being Human Foundation currently operates only in India.
Posted by Salman Khan on Saturday, May 2, 2015
शनिवारी रात्री उशिरा सलमाननं हा खुलासा केलाय. ज्या बॉलिवूड हस्तींनी नेपाळला मदत पुरविली त्या हस्तींमध्ये सलमानच्या नावाचाही समावेश होता. पण, सलमाननंच याचं खंडन केलंय.
पण, यापुढेही बिईंग ह्युमन नेपाळच्या आपतग्रस्तांना मदत करणार किंवा नाही, याबद्दल मात्र सलमाननं काही म्हटलेलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.