आधीचे भ्रष्टाचारी नेते आता भाजपसाठी संत झालेत - पवार

भाजपनं काही वर्षांपूर्वी आमच्या मंत्र्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विधीमंडळात गोंधळ घालून सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. मात्र त्यावेळी भाजपसाठी जे भ्रष्टाचारी होते ते आता संत झालेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. 

Updated: Oct 10, 2014, 01:53 PM IST
आधीचे भ्रष्टाचारी नेते आता भाजपसाठी संत झालेत - पवार title=

सटाणा, नाशिक: भाजपनं काही वर्षांपूर्वी आमच्या मंत्र्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विधीमंडळात गोंधळ घालून सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. मात्र त्यावेळी भाजपसाठी जे भ्रष्टाचारी होते ते आता संत झालेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील सटाणा इथं आज शरद पवार यांनी सभा घेतली. या सभेत बबनराव पाचपुते यांच्या भाजपप्रवेशावर पवारांनी टीका केली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विरोधकांनी आमच्या दोन मंत्र्याना राजीनामा द्यायला भाग पाडलं. आता याच मंडळींना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 

शरद पवार संरक्षणमंत्री असताना सीमारेषेवर कधी गेले होते का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारला होता. यावरही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. मी संरक्षणमंत्री असताना सीमारेषेवर गेले होतो असं स्पष्ट करतानाच आता देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही अशी टीकाही त्यांनी केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.