वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी केलं यमराजांना पाचारण

बेशिस्त वाहतुकीसाठी कुप्रसिध्द असलेले पुणेकर वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी नवनवीन फंडे वापरत असतात. अश्या वाहनचालकांना सुज्ञ बनविण्यासाठी वाहतूक पोलिसही नवनवीन उपक्रम हाती घेताहेत. 

Updated: May 20, 2017, 06:42 PM IST
वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी केलं यमराजांना पाचारण title=

पुणे : बेशिस्त वाहतुकीसाठी कुप्रसिध्द असलेले पुणेकर वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी नवनवीन फंडे वापरत असतात. अश्या वाहनचालकांना सुज्ञ बनविण्यासाठी वाहतूक पोलिसही नवनवीन उपक्रम हाती घेताहेत. 

सेल्फी विथ यमराज हा एक उपक्रमाचं भाग. पुणेकरांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी त्यांनी चक्क यमराजला पाचारण केलं होतं. 

जे वाहनचालक नियम मोडतील त्यांना शिस्तीचं महत्त्व पटवून देणं त्याचप्रमाणे जे नियम पाळतात त्यांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत करणं असा कार्यक्रम या यमराजांनी टिळक चौकात राबवला. लायन्स क्लबच्या सहकार्याने ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली.