कौटुंबिक हत्याने पुन्हा ठाणे हादरले, पतीने बायको-मुलावर केला हल्ला

कौटुंबिक हिंसेने पुन्हा ठाणं हादरले आहे. कर्जबाजारीपणा आणि मुलाच्या आजारपणाला कंटाळलेल्या सीताराम पेडणेकर या व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचा हाताची नस कापून खून केला. तसंच मुलाचाही खून करण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Mar 23, 2016, 10:56 PM IST
कौटुंबिक हत्याने पुन्हा ठाणे हादरले, पतीने बायको-मुलावर केला हल्ला title=
संग्रहित

ठाणे : कौटुंबिक हिंसेने पुन्हा ठाणं हादरले आहे. कर्जबाजारीपणा आणि मुलाच्या आजारपणाला कंटाळलेल्या सीताराम पेडणेकर या व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचा हाताची नस कापून खून केला. तसंच मुलाचाही खून करण्याचा प्रयत्न केला. 

या प्रकारानंतर पेडणेकर यांनी वीष पिऊन त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. दिवसभर सीताराम पेडणेकर बेशुद्ध होते. मात्र संध्याकाळी शुद्ध आल्यावर त्यानी या हत्येची कबुली दिली.