www.24taas.com, मुंबई
आदर्श घोटाळ्याप्रकरणी आज अशोक चव्हाणांची साक्ष होणार आहे. सुशील कुमार शिदेंनी विलासराव देशमुखांवर आणि विलासराव देशमुखांनी आदर्शचं खापर अशोक चव्हाणांवर फोडल्यानंतर आता अशोक चव्हाण काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.
शनिवारी अशोकराव आयोगासमोर जातील तेव्हा विलासरावांच्या साक्षीमुळे निर्माण झालेल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. हा चक्रव्यूह भेदताना अशोक चव्हाणांची कसोटी लागणार आहे. बुधवारी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आयोगानं केलेल्या चौकशीत दिलेली साक्षही अशोक चव्हाणांना अडचणीत आणणारी होती. इरादा पत्रावर काळजीवाहू मुख्यमंत्री असताना आपण सही केल्याचं त्यांनी मान्य केलं खरं, पण महसूल आणि अर्थखात्याकडून मंजुरी आल्यानंतरच आपण इरादा पत्रावर सही केल्याचं सांगत अशोक चव्हाण आणि तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनाही त्यांनी जबाबदार ठरवलंय. त्यामुळे आता यावर अशोक चव्हाणांचं स्पष्टीकरण महत्त्वाचं ठरेलं.
.