www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जिथे कळी उमलण्याआधीच खुडली जाते, अशी मुंबईतली कमाठीपुरा ही जागा...... जिथे स्वप्नं पाहण्याचा अधिकार जवळजवळ परवानगी नाहीच.... पण त्याच वातावरणात वाढलेल्या पिंकीनं फक्त स्वप्न पाहिलीच नाहीत तर ती पूर्णही केली.
प्रचंड नरकयातना भोगून झाल्यावर पिंकी वयाच्या 14 व्या वर्षी या भागातून पळून आली आणि एका स्वयंसेवी संस्थेसोबत रहायला लागली.. लहानपणापासूनच डान्स हेच तिचं पॅशन....आणि त्या पॅशनला जोड मिळाली अमेरिकेच्या ‘साउंड्स ऑफ द होप’ या संस्थेची... एका वर्षभरात पिंकीला संधी मिळाली नृत्याच्या आंतरराष्टीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची...
कामाठीपुरा म्हणजे नक्की काय, हे कळण्याचंही पिंकीचं वय नाही. पण ही दुनिया वेगळीच आहे आणि तितकीशी चांगली नाही, हे तिच्या लक्षात आलं आणि ती बाहेर पडली. 14 वर्षांची पिंकी कधीही शाळेत गेलेली नाही..भूताकाळातल्या घटनांनी आजही तिला झोप येत नाही. पण आता सातासमुद्रापार अमेरिकेत जाऊन तिने इतका आत्मविश्वास कमावलाय. जो तिला आयुष्यभर हिंमत देत राहील..... अशीच प्रेरणा आणि असंच बळ बदनाम वस्त्या म्हणून ओळखल्या जाणा-या वस्तीतल्या सगळ्याच मुलींना मिळो, हीच अपेक्षा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.