मुंबई : वांद्रा पोटनिवडणूक लढविण्याबाबत काँग्रेस नेते नारायण राणे यांचे तळ्यातमळ्यात असल्याचे दिसून आले. पक्षाने विचारणा केली असताना त्यांनी वेळ मागून घेतली आहे. अद्याप आपला निर्णय स्पष्ट राणेंनी केलेला नाही.
राणे नाराज असल्याचे चर्चा गेले काही दिवस होती. याबाबत राणे म्हणाले, प्रदेश अध्यक्ष निवड करताना राज्यातील नेत्यांना विचारणे गरजेचे होते. महाष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव याचा विचार करण्याची गरज होते. त्यावर चर्चा होण्याची गरज होती. मात्र, थेट प्रदेशअध्यक्ष निवडला गेला. याला आमचा विरोध आहे.
आताचे प्रदेश अध्यक्ष नविन आहेत. पूर्वीचे वेगळे होते. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. मी अशोक चव्हाण यांच्या विषयी नाराजी व्यक्त केलेली नाही, असे राणे म्हणालेत.
मी पक्षीय राजकारणात सक्रीय आहे आणि राहणार. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्यावेळी मी तेथे जाऊन कार्यर्त्यांशी चर्चा केली. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये सक्रीय नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. राणे पूर्वीप्रमाणे आक्रमक नाही, असे म्हटले जाते यावेळी राणे म्हणाले, योग्य वेळ यायची आहे. त्यावेळी माझी आक्रमकता दाखवून देईन, असे स्पष्ट मत राणे यांनी यावेळी व्यक्त केले.
बाळा सावंत हे गेले ही दुदैवी घटना आहे. पक्षाने मला विचारले आहे. मात्र, पक्षाने मी विचार करण्यासाठी वेळ मागितली आहे. माझा निवडणूक लढविण्याचा विचार नाही. मात्र, पक्षाने विचारणा केल्याने मी वेळ मागून घेतलेय, असे राणे म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.