मुंबई : मालाड विषारी दारू दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ५३ वर पोहचलीय. तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४० जणांपैकी ११ जणांची स्थिती अजूनही गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
सायन हॉस्पिटलमध्ये भरती केलेल्या ३ रुग्णांपैकी दोन जण अत्यवस्थ अवस्थेत आहेत. तर नायरमध्ये उपचार घेणाऱ्या ९ जणांपैकी ५ जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. केईएमला ६ पैंकी ४ जण गंभीर अवस्थेत आहेत. तर शताब्दी हॉस्पिटलमध्ये २२ जणांवर उपचार सुरू आहेत
दरम्यान, या प्रकरणात आठ पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. मालाड मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह आठ जणांवर कारवाई करण्यात आलीय.
मालाडमध्ये अवैधरित्या गावठी दारू विकली जात असल्याची माहिती असतानाही पोलीस कारवाई करत नव्हते. उलट याच दारूगुत्तेवाल्यांकडून हफ्ते गोळा करत होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.