९ सिक्सर आणि ६ चौकारांसह BPLमध्ये आले 'गेल वादळ'

 बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये गोलंदाजाचे वर्चस्व दिसत असताना एका फलंदाजाने आपला धाक कायम राहखला आहे. तो आहे ख्रिस गेल.... या विध्वंसक फलंदाजांनी गोलंदाजांची पिसे काढली. 

Updated: Dec 10, 2015, 05:11 PM IST
९ सिक्सर आणि ६ चौकारांसह BPLमध्ये आले 'गेल वादळ' title=

ढाका :  बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये गोलंदाजाचे वर्चस्व दिसत असताना एका फलंदाजाने आपला धाक कायम राहखला आहे. तो आहे ख्रिस गेल.... या विध्वंसक फलंदाजांनी गोलंदाजांची पिसे काढली. 

काल रात्री चितगाव विकिंग्स आणि बरिसल बुल्समध्ये सामना झाला त्यात ख्रिस गेलच्या तुफानी खेळीमुळे बरिसल बुल्सने ८ विकेट आणि ५ ओवर राखून सहज सामना जिंकला. 

पाहा व्हिडिओ

टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या चितगाव विकिंग्स यानी २० षटकात १३५ धावा काढल्या. त्यानंतर सुरू झाला गेलाचा खेळ... १३५ धावांचा पाठलाग करताना बरिसल बुल्सने गेलच्या ९ सिक्सर आणि ६ चौकारांच्या मदतीने ९२ धावांची खेळी केली आणि विरोधी टीमला चितगावमध्ये चित केले. 

गेलने ४७ चेंडूत १९६ च्या स्टाइक रेटने ९२ धावा केल्या. गेलने टी-२० क्रिकेटमध्ये आपले १७ शतक ठोकण्यापासून दूर राहिला. या अर्धशतकाच्या सहाय्याने आता टी-२० क्रिकेटमध्ये ५३ वे अर्धशतक झळकावले आहे. 

शतकांमध्ये टी-२०मध्ये गेल सर्वांच्या पुढे आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम ७ शतकांच्या साहाय्याने दुसऱ्या स्थानावर आहे. 

गेलने २२५ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात ४४.३२ च्या सरासरीने ८३३३ धावा केल्या आहे. त्यात त्याचा स्टाइक रेट १५०च्या आसपास आहे. 

नुकतेच त्याने बिग बॅश लीगमध्ये वेस्टर्न वॉरिअर्सविरूद्ध खेळताना गेलने एका ओव्हरमध्ये ३२ धावा केल्या होत्या. पाहा व्हिडिओ...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.