कॅलिफोर्निया: मोबाईलच्या जगात प्रसिद्ध असलेली कंपनी अॅपलनं मंगळवारी मध्यरात्री आपला नवा स्मार्टफोन 6S आणि 6S प्लस लॉन्च केलाय. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला. आयफोन ६एस सिल्व्हर, गोल्ड, स्पाइस ग्रे आणि रोज गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध असेल. आयफोनचं हे नवं मॉडेल आपल्या आधीच्या स्मार्टफोन पेक्षा थोडा पातळ आणि जड आहे. अॅपलचा हा लॉन्चिंग इव्हेंट सॅन फ्रॅन्सिस्कोच्या बिल ग्रॅहम सिविक ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता.
आयफोन 6S आणि 6S प्लसच्या लाइव्ह फोटो फीचरमध्ये आपण थ्री डी टच वापरू शकता. नवीन आयफोनमध्ये एक नवा फेसटाइम कॅमेरा सुद्धा आहे. ५ मेगापिक्सेल फ्रँट कॅमेरा देण्यात आलाय. नव्या आयफोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. A8च्या तुलनेत सीपीयू टास्कला ७० टक्के अधिक फास्ट करतो. तर ग्राफिक्स टास्क ९० टक्क्यांहून अधिक स्पीडनं पूर्ण होतील.
यात '३डी टच डिस्प्ले' पण आहे. कारण तीन वेगवेगळ्या लेव्हलवर (टच, प्रेस आणि डीपर प्रेस)च्या टचमध्ये अंतर करू शकता. हे फीचर अॅपल स्मार्ट वॉचमध्ये पहिल्यांदा दिलेल्या फीचरचं नेक्स जनरेशन व्हर्जन आहे. फोर्स टचने टच एक्सपीरियंस चांगला होईल आणि रिस्पॉन्स टाइम कमी होईल. त्यामुळं अॅप्स अधिक गतीनं काम करतील.
आयफोन ६एसमध्ये आयसाइट सेंसरसोबत १२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि फेसटाइम सेंसरसोबत ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. आपण यामुळे चांगले सेल्फी काढू शकाल. याशिवाय याचं इमेज सिग्नल प्रोसेसर पण अपग्रेडेड होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.