नवी दिल्ली : रिलायन्स जिओची फ्री कॉलिंग आणि डेटाची ऑफर १ एप्रिलपासून बंद होणार होती. पण रिलायन्स जिओने प्राईम मेंबरशिपसाठी तारीख वाढवली आहे. आता १५ एप्रिल पर्यंत रिलायन्स जिओची प्राईम मेंबरशिप घेता येणार आहे.
प्राईम मेंबरशिप प्लानमध्ये जिओच्या युजर्सला ९९ रुपये भरुन १ वर्षासाठी ऑफर पुन्हा मिळवता येणार आहे. त्यानंतर महिन्याला ३०३ रुपयांचं रिचार्ज करुन फ्री ड़ेटा आणि कॉलिंगची सेवा घेता येणार आहे.
पण जर तुम्ही प्राईम मेंबरशिप नाही घेतली तरी तुम्हाला फ्री वॉईस कॉल कोणत्य़ाही रोमिंग चार्जेस शिवाय मिळणार आहेत.
३१ मार्चपर्यंत जिओच्या युजर्सला प्राईम मेंबरशिप घेणं शक्य न झाल्याने तारीख वाढवण्यात आली आहे. टारगेट पेक्षा कमी लोकांनीच प्राईम मेंबरशिप घेतल्याने जिओने ही तारीख १५ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.