मुंबई: असे अनेक जोडपे आहेत ज्यांचं लग्नानंतर लगेच पटत नाही आणि नात्यात कटूता निर्माण होते. पहिले त्यांच्यात खूप चांगली मैत्री आणि विश्वास असतो, पण लग्नानंतर असं का होतं? जाणून घ्या अशाच काही गोष्टी ज्या लग्नानंतर लगेच करू नये, त्यामुळं आपलं नातं सांभाळायला मदत होईल.
आणखी वाचा - खरं प्रेम करणारेच समजू शकतील या ११ गोष्टी
१. लग्नात झालेला खर्च - लग्नात खूप खर्च होत असतो. पण लग्नानंतर दररोज त्याच खर्चाबाबत बोलणं आणि त्यावर वाद घालणं योग्य नाही.
२. नातेवाईकांची खिल्ली उडवणं - असं चुकूनही करू नका. मुलाच्या आणि मुलीच्या दोघांच्याही कुटुंबियांची खिल्ली उडवू नये. लग्नानंतर लगेच जोडीदाराच्या घरातील व्यक्तींबाबत वादग्रस्त प्रतिक्रियाही देऊ नये.
३. एक्स बॉयफ्रेंडसोबत तुलना - कधीही आपल्या नवऱ्याची एक्स बॉयफ्रेंडसोबत तुलना करू नका किंवा नवऱ्यानं एक्स गर्लफ्रेंडची तुलना बायकोसोबत करू नका. नुकतंच लग्न झालेलं असतं आणि आपली ही तुलना करण्याची सवय आपल्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम करते.
४. मित्रांना नावं ठेवणं - लग्नानंतर कोणत्याही एका गोष्टीबाबत जोडीदाराच्या मित्रांना वारंवार नावं ठेवू नका, त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक आयुष्यावर होतो.
५. तोरा दाखवणं - अनेकदा लग्नानंतर मुली नवऱ्याला म्हणतात हे तुझं काम आहे तर तू कर. हे योग्य नाही. खरं तर ज्याचं काम त्यानंच केलं पाहिजे पण लग्नानंतर आपण नवरा-बायको म्हणून एकत्र राहणार असता. त्यामुळं एकमेकांना प्रत्येक कामात मदत करणं योग्य आहे.
आणखी वाचा - सुंदर मुलींना सर्वसामान्य दिसणारे मुलं का आवडतात?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.