Diwali 2024 : अमावस्या तिथी 2 दिवस असल्याने लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय? प्रदोष कालचा सर्वोत्तम योग

Lakshmi Pujan Muhurt : यंदा प्रकाशाचा उत्साह सण दोन दिवस देशभरात साजरा होतोय. अमावस्या तिथी दोन दिवस आल्यामुळे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता याबद्दल जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Oct 31, 2024, 01:42 PM IST
Diwali 2024 : अमावस्या तिथी 2 दिवस असल्याने लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय? प्रदोष कालचा सर्वोत्तम योग title=

Lakshmi Pujan Muhurt : प्रकाशाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नरक चतुर्दशी झाल्यानंतर आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला दिवाळी लक्ष्मीपूजन करण्यात येतं. यंदा पंचांगानुसार अमावस्या तिथी ही 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटापासून 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटापर्यंत असणार आहे. अशात स्थितीत लक्ष्मीपूजन करण्याबद्दल दोन प्रवाह आहे. काही धर्मशास्त्र तज्ज्ञ सांगतात 31 ऑक्टोबरला संध्याकाळी तुम्ही लक्ष्मी पूजन करायला हवं. तर काही जण अभ्यासक 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करायला हवं असं सांगतात. 

महाराष्ट्रात मराठी पंचांगानुसार 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करण्यात येणाराय. तर मुंबईत 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन होणार आहे. तुम्ही कोणत्याही लक्ष्मीपूजन करणार असाल तरी पूजनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

1 नोव्हेंबरसाठी लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त  

1  नोव्हेंबरला प्रदोष काळ आणि अमावस्या तिथीही असेल. म्हणजेच 01 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 05:36 ते 06:16 पर्यंत लक्ष्मी पूजनासाठी फक्त 40 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल. 

दिवाळीतील प्रदोष कालचा सर्वोत्तम योग

प्रदोष काळातील खूप चांगला योगही गुरुवारी पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवशी प्रदोष काल, निशीथ काल आणि महानिषित काल यांचा शुभ संयोग आहे. धार्मिक शास्त्रानुसार दिवाळीच्या पूजेमध्ये प्रदोष कालावधी खूप महत्त्वाचा आहे. प्रदोष काळ हा घरगुती आणि व्यावसायिक कामांसाठी महत्त्वाचा आहे. 

लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त अमावस्या काळात -  संध्याकाळी 5:36 ते 6:15 पर्यंत

प्रदोष काळात लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त - संध्याकाळी 5:35 ते रात्री 08.06 पर्यंत 

दिवाळीच्या दिवशी असं करा दीपदान 

पहिले पाच दिवे प्रज्वलित केले जातील. यातील एक दिवा स्वयंपाकघरात, एक वॉशरूममध्ये, एक घराच्या उंबरठ्यावर आणि दोन दिवे पूजेच्या ठिकाणी असतील. हे असतील तेलाचे दिवे
यानंतर 11 दिवे प्रज्वलित केले जातील ज्यामुळे घर आणि पूजेचे स्थळ उजळून निघेल.
दोन दिवे अखंड असतील. यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा आणि तुपाचा एक दिवा असेल. मोहरीचा दिवा डाव्या हाताला असेल. 

लक्ष्मीपूजन साहित्य (Lakshmi Pujan Sahitya) 

लक्ष्मीपूजनकरिता काय साहित्य लागतं याविषयी आपण जाणून घेऊयात 

लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती
गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती
कुबेराचा फोटो किंवा मूर्ती
नाणी किंवा नोटा
दागिने किंवा चांदीची नाणी
एक कोरीवही घ्यावी त्यावर कुंकवाने ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा. 
चौरंग किंवा पाठ 
लाल रंगाचे कापड 
पाणी
तांदूळ 
गंध 
पंचामृत
हळद, कुंकू 
अक्षदा 
फुले 
विड्याची पाच पाने 
झाडू
लाह्या बताशे

लक्ष्मीपूजन विधी (Lakshmi Pujan ritual)

लक्ष्मीपूजन विधी करण्याकरिता सर्वप्रथम देवघरामध्ये एक चौरंग ठेवावा त्यावर लाल कापड अंथरून घ्यावा. त्यावर उजव्या बाजूला कळस मांडावा त्या कळसांमध्ये पाच विड्याची पाने टाकावी, एक रुपयाची नाणी टाकावे आणि कळसाच्या वर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असली पाहिजे. आपण जो चौरंग घेतला आहे, त्या चौरंग वर मध्यभागी तांदुळाची रास करावी.  त्यावर गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारी ठेऊ शकतात. त्यानंतर चौरंगावर जागा शिल्लक असेल त्या जागेमध्ये हिशोबाची वही आणि पेन ठेवावी तसंच पैसे नाणी ठेवावे. त्यानंतर चौरंगाची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यावी. फराळ आणि लाह्या बताशे यांचा नैवेद्य दाखवावा. झाडूला लक्ष्मी मानतात म्हणून नवीन झाडूची पूजा केली जाते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)