घरातील मंदिराच्या 'या' नियमांकडे नक्की लक्ष द्या, ठरतील लाभदायक

तुमच्या घरातील मंदिरात 'या' नियमांचं होतंय पालन, काय आहेत नियम एकदा वाचा...  

Updated: Jul 12, 2022, 08:05 AM IST
घरातील मंदिराच्या 'या' नियमांकडे नक्की लक्ष द्या, ठरतील लाभदायक title=

मुंबई : प्रत्येकाच्या घरात मंदिर असतं. प्रत्येक जण घरातल्या देवाची पूजा करतो. पण घरात असलेल्या मंदिरासाठी देखील काही विशेष नियम आहे. काहींना हे नियम माहिती देखील असतील, पण ज्यांना माहिती नाही त्यांनी ते जाणून घेणं अत्ंयत महत्त्वाचं आहे. कारण नियमांचं पालन देखील तितकचं महत्त्वाचं आहे. आज आपण जाणून घेऊ घरातल्या किंवा ऑफिसमधल्या  मंदिरात पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी... 

घरात मंदिर तयार करताना या नियमांचं करा पालन
- वास्तुशास्त्रानुसार घराचे मंदिर नेहमी ईशान्य दिशेला असायला हवं. पूजेचे घर कधीही दक्षिणेकडे नसावे हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या कामात अडथळे निर्माण होतात.

- मंदिरासोबतच व्यक्तीने कोणत्या दिशेला तोंड करावे, हेही महत्त्वाचे आहे. मंदिरात लाल रंगाचा बल्ब लावू नका. असं केल्याने व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहते. पांढऱ्या रंगाचा बल्ब लावल्याने घरात सकारात्मकता येते.

- यासोबतच वास्तूनुसार घरामध्ये खंडित मूर्ती ठेवू नका.  मूर्ती वेळेत पाण्यात विसर्जित करा. अन्यथा नकारात्मक ऊर्जा घरात राहते.

-  मंदिरात विसरुनही शिळी फुले ठेवू नका. तसेच मंदिरात पूर्वजांचे फोटो ठेवू नये. मंदिरातील भांडी स्वतंत्रपणे धुवा. मंदिरातील भांड्यासाठी एक  वेगळी जागा राहूद्या. 

- मंदिरात लाल रंगाच्या कापडाचा वापर करु नका,  असं वास्तू तज्ञ सांगतात. तसेच पूर्वेकडे तोंड करून बसावे.

- घरातील मंदिरात एकाचं देवीची अनेक फोटो लावू नका. घरात 2 पेक्षा अधिक शिवलिंग किंवा शंक ठेवू नका. कारण या गोष्टींची काळजी घेतली नाही तर घरात अशांतता निर्माण होते.

- घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने धनलाभ होईल. रखडलेले पैसे देखील परत मिळतील. 

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)