Vastu Tips : प्रत्येकाला गरम तव्याबद्दलचे 'हे' नियम माहिती हवेत, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम

Astro Tips : घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहवं म्हणून अनेक जण वास्तूशास्त्राची मदत घेतात. प्रत्येकाच्या किचनमधील तव्याबद्दलही वास्तू शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. 

Updated: Dec 11, 2022, 03:20 PM IST
Vastu Tips : प्रत्येकाला गरम तव्याबद्दलचे 'हे' नियम माहिती हवेत, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम title=
vastu tips Everyone should know these rules about hot pan or garam tawa face dire consequences loss money nmp

Vastu Tips For Hot Pan : प्रत्येकाचं घर (house) हे त्याचं स्वप्न असतं. या घरात कायम लक्ष्मीचा वास असावा, असं प्रत्येकाला वाटतं. शिवाय घर म्हणजेच आपली वास्तूमध्ये (Astro Tips) कायम आनंदी वातावरण आणि सकारात्मक (positive) वातावरण राहवं म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. मात्र काही केल्या घरात कलेश, वादावादी किंवा आर्थिक संकट (financial crisis) येतं असेल तर आपण वास्तूशास्त्राची मदत घेतो. जर तुमच्याही घरात असं होतं असेल तर याचा अर्थ तुमचं काही तरी चुकतंय...

जसं म्हटलं जातं की पहिली चपाती (Roti) गायीसाठी आणि दुसरी पोळी (chapati)श्वानसाठी करावी असं शास्त्रात सांगितलं आहे. तसंच या पोळीच्या तव्याबद्दलही वास्तूशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. प्रत्येक भारतीय घराच्या स्वयंपाकघरात पोळी बनवण्याचा तवा असतो. याला काही जन पॅन देखील म्हणतात. परंतु तुम्हाला माहित आहे का, की वास्तुशास्त्रानुसार तव्याचे असे काही नियम आहे, जे आपण करु नये असे म्हटले जाते. त्यांपैकी एक आहे तव्यावर पाणी टाकणे. (vastu tips Everyone should know these rules about hot pan or garam tawa face dire consequences loss money)

आपण आपल्या आईला किंवा घरातील मोठ्या माणसांना हे सांगताना ऐकलं असेल की, तव्यावर पाणी टाकू नये. परंतु ते असं का सांगतात? यामागचं कारण आपल्याला माहित नसतं. परंतु वास्तुशास्त्रात याला महत्व आहे. आता वास्तुशास्त्र याबाबत काय सांगतं? जाणून घेऊ या.

गरम तव्यावर पाणी का टाकू नये?

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही सवय असते, तर काही लहान मुलं मज्जा म्हणून गरम तव्यावर पाणी टाकतात. खरंतर गरम तव्यावर पाणी टाकल्याने ते पाणी तडतडू लागतं, जे बऱ्याच लोकांना पाहायला खूप आवडतं. ज्यामुळे ते तव्यावरती पाणी टाकतात. 

परंतु वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्यावर जो आवाज तयार होतो, तो आवाज घरात नकारात्मकता आणतो, यामुळे घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवू शकतो.

गरम तव्यावर पाणी टाकल्याने मुसळधार पाऊस पडतो, असेही मानले जाते. असा पाऊस विध्वंस घडवून आणतो, म्हणून वडीलधारी मंडळी तसे करण्यास नकार देतात.

पाण्याचा संबंध राहूशी असल्याचे मानले जाते. त्यामुळे मोठ्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. वास्तुशास्त्रानुसार, पॅन नेहमी स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवावा, जिथून बाहेरच्या व्यक्तीला ते दिसले नाही पाहिजे.

 

हेसुद्धा वाचा - Astro Tips : चपाती करताना चुकूनही करु नका या गोष्टी, नाही तर अन्नपूर्णासोबतच महालक्ष्मी होईल नाराज

 

- तवा नेहमी खाली आडवा ठेवावा. त्याला उभे ठेवणे योग्य नाही.

-तवा कधीही घाण ठेवू नका. तो वापरल्यानंतर नेहमी स्वच्छ ठेवा. नाहीतर घरात गरीबी निर्माण होते.

- जेव्हा तुम्ही पोळी बनवायला सुरुवात कराल, तेव्हा तव्यावर थोडे मीठ शिंपडा. असे केल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही.

दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास मीठामुळे तवा जंतूमुक्त होतो आणि त्यावर बनवलेल्या रोट्या खाल्ल्याने आजार होत नाहीत.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)