Weekly Tarot Horoscope : बुधादित्य राजयोगामुळे ‘या’ आठवड्यात 5 राशींना मोठा आर्थिक फायदा, पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 10 to 16 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या या आठवड्यात बुध आणि सुर्य कुंभ राशीत भ्रमण करणार असल्याने बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. या राजयगोचा 5 राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह करिअरमध्ये फायदा होणार आहे. चला तर मग जाणून टॅरो कार्डनुसार 12 राशींसाठी कसा असेल फेब्रुवारीचा हा आठवडा...  

नेहा चौधरी | Updated: Feb 10, 2025, 04:04 PM IST
Weekly Tarot Horoscope : बुधादित्य राजयोगामुळे ‘या’ आठवड्यात 5 राशींना मोठा आर्थिक फायदा, पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य title=

 Weekly Tarot Horoscope Prediction 10 to 16 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोगाची निर्मिती अनेक राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. कुंभ राशीत बुध आणि सूर्य एकत्र भ्रमण करत असल्याने याचा शुभ संयोग निर्माण होतोय. बुधादित्य राजयोग हा टॅरो कार्ड्सच्या गणनेनुसार काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. करिअरमधील प्रगतीसह बँक बॅलेन्स वाढणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी फेब्रुवारीचा दुसरा आठवडा साप्ताहिक टॅरो भविष्य टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून  

मेष (Aries Zodiac)  

या आठवड्यात या राशीच्या लोकांनी त्यांची ऊर्जा योग्य दिशेने वळवली पाहिजे. त्यासोबत मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घ्या. त्यासोबत अगदी काळजीपूर्वक विचार करुन कुठलाही निर्णय घ्या. तुमच्याकडे येणाऱ्या संधी ओळखायला शिका. नात्यांमध्ये सुसंवाद राखा आणि शहाणपणाने वागणे तुमच्या हिताच ठरेल. कुठल्याही वादात अडकू नका.

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा पैशाच्या बाबतीत चांगला असणार आहे. तुमची आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे. तरीही, पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. हा काळ गुंतवणुकीसाठीही चांगला ठरणार आहे. पण, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक विचारपूर्वक करणे महत्त्वाचे असणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध ठेवा. तुम्हाला कामात एक नवीन मार्ग सापडणार आहे. जो तुमच्या करिअरला फायदेशीर ठरणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित असणार आहे. जुन्या कामात काही अडचणी येणार आहेत. पण, तुमच्यात या अडचणींना तोंड देण्याची क्षमता राहणार आहे. नात्यांमध्ये संवादाचा अभाव असू शकतो. म्हणून, कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका आणि मोकळेपणाने बोला. ऑफिसमधील एखाद्या कामात तुम्हाला कोणाची तरी मदत मिळणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac) 

हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास आणि दृढनिश्चयाचा आठवड्याने भरलेला आहे. जर तुम्ही मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करत असाल तर यश मिळण्याची शक्यता जास्त असणार आहे. पण, घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये भावना संतुलित ठेवा. तुम्हाला एखादा जुना मित्र भेटणार आहे.

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. थकवा आणि ताण टाळण्यासाठी स्वतःसाठी वेळ या आठवड्यात काढा. कामात काही बदल होऊ शकतात, मात्र ते तुमच्यासाठी चांगले असणार आहे. प्रेमाच्या बाबतीत नवीन भावनांचे स्वागत करणार आहात. नातेसंबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा.

कन्या (Virgo Zodiac)    

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधींनी भरलेला असणार आहे. स्वतःला सिद्ध करण्याची हीच वेळ असणार आहे. तुम्हाला कामात यश मिळणार असून समाजात तुमचा आदर वाढणार आहे. काही वैयक्तिक आव्हाने उद्भवू शकणार आहेत. मात्र तुम्ही त्यावर सहज मात करु शकणार आहात. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा असणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहे. कोणताही बाह्य घटक तुमचे मनोबल कमकुवत करु शकतात त्यामुळे ते समजून घ्या. पण, आत्मविश्वासाने तुम्ही त्यावर मात करणार आहात. जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होणार आहे. जीवनात संयम आणि शहाणपण राखणे महत्वाचे असणार आहे.

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

या आठवड्यात या राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही मोठे बदल पाहिला मिळणार आहे. जर तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केले तर हे बदल तुमच्यासाठी चांगले ठरू शकतात. प्रेमाच्या बाबतीत नवीनता आणि उत्साह दिसून येणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला मोठी संधी मिळणार आहे. या संधीचा पुरेपूर फायदा होणार आहे. 

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या पैशाच्या बाबींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. तुम्हाला पैसे कमविण्याची चांगली संधी मिळणार आहे. मात्र सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नातेसंबंधांमध्ये काही तणाव जाणवणार आहे. मात्र तुम्ही ते संभाषणाद्वारे सोडवू शकणार आहेत. जुन्या बाबतीत नवीन सुरुवात पाहिला मिळेल. तुमचे निर्णय घेताना शहाणपणा बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळणे तुमच्या हिताच ठरणार आहे. 

मकर (Capricorn Zodiac)  

या राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांचे विचार व्यवस्थित करणे गरजेचे आहे. जर तुम्ही कोणत्याही कामात गुंतले असाल तर तुम्हाला त्यात यश मिळणार आहे. पण, त्यासाठी संयम आणि कठोर परिश्रम केल्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही. तरदुसरीकडे या आठवड्यात नात्यांमध्ये जवळीक वाढणार आहे. पण, इतरांच्या भावनांचा आदर करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा बोलताना विचारपूर्वक बोला. 

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात काही नवीन योजनांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. नोकरीत काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी हा चांगला काळ राहणार आहे. नातेसंबंधांमध्ये काही किरकोळ मतभेद होण्याची शक्यता आहे. पण, तुम्ही ते सहज सोडवण्यात यशस्वी होणार आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद मिळणार आहे. 

मीन (Pisces Zodiac) 

या राशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या आरोग्याकडे आणि मानसिक शांततेकडे लक्ष देणं गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी अचानक काही समस्या उद्भवणार आहे. पण, तुम्ही ते सहज त्या सोडवणार आहात. आयुष्यात काही गंभीर निर्णय घ्यावे लागणार आहे. नातेसंबंधांमध्ये तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)