बुमराहने आपल्या यशाचं श्रेय दिलं न्यूझीलंडच्या 'या' वेगवान गोलंदाजाला

आपल्या यशाचं रहस्य सांगताना जसप्रीत बुमराहने त्याचं श्रेय न्यूझीलंडच्या माजी वेगवान गोलंदाजाला दिलं आहे.

Updated: May 14, 2021, 05:41 PM IST
बुमराहने आपल्या यशाचं श्रेय दिलं न्यूझीलंडच्या 'या' वेगवान गोलंदाजाला  title=

मुंबई: जसप्रीत बुमराह जगभरात आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. टीम इंडिया आणि IPL2021 मुंबई इंडियन्स संघातील यशस्वी गोलंदाज म्हणून बुमराहकडे पाहिलं जातं. बुमराह आपल्या ओव्हरमध्ये सर्वात कमी धावा देऊन विकेट्स काढतो. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज बुमराहने आपल्या यशाचं श्रेय न्यूझीलंडच्या गोलंदाजाला दिलं आहे. 

न्यूझीलंड संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचे मुंबई इंडियन्स संघाचे कोच शेन बॉन्ड यांना आपल्या यशाचं श्रेय दिलं आहे. बुमराहने आपल्या यशामध्ये त्यांचा सर्वात मोठा वाटा असल्याचं सांगितलं आहे. 

'टीम इंडियासोबत असताना मी जेवढं शक्य असेल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझा प्रवास इतका सुंदर होऊ शकला. माझ्यासाठी प्रत्येक वर्ष तितकच महत्त्वाचं आहे. प्रत्येक वर्षात मला काही ना काही नवीन गोष्टी शिकायला मिळातात आणि मी यापुढे देखील त्यांच्याकडून शिकत राहणार आहे.' 

'बॉन्ड जेव्हा खेळतात तेव्हा त्यांची गोलंदाजी पाहायला मला खूप आवडतं खूप आनंद होतो. 2015मध्ये माझी त्यांच्यासोबत पहिल्यांदी भेट झाली. मी त्यांना लहानपणापासून खेळताना पहिलं आहे. त्यांनी मला मैदानात अनेक गोष्टी आत्मसात करण्यासाठी मदत केली आहे. त्यांचं आणि माझं नातं खूप खास आहे. '

जसप्रीत बुमराहने 19 टेस्ट 67 वन डे 50 टी 20 आणि 99 IPLचे सामने खेळले आहेत. 19 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 83 विकेट्स घेतल्या आहेत. तर IPLमध्ये 99 सामने खेळून 115 विकेट्स घेतल्या आहेत.