विनोद कांबळीसाठी एकनाथ शिंदेंनी पुढे केला मदतीचा हात, व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

Vinod Kambli : विनोद कांबळी याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी क्रिकेटरसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

पुजा पवार | Updated: Dec 25, 2024, 11:14 AM IST
विनोद कांबळीसाठी एकनाथ शिंदेंनी पुढे केला मदतीचा हात, व्हिडीओ शेअर करून दिली माहिती  title=
(Photo Credit : Social Media)

Vinod Kambli : भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी (Vinod Kambli) सध्या आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहे. शनिवारी त्याची तब्येत अचानक बिघडली ज्यामुळे त्याला ठाण्यातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान विनोद कांबळी याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी क्रिकेटरसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.  श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने विनोद कांबळी याला 5 लाखांची मदत करण्यात आलेली आहे. याविषयीची माहिती एका व्हिडीओ द्वारे देण्यात आली असून यात कांबळी भावुक झालेला दिसला. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ओएसडी मंगेश चिवटे यांनी डॉक्टरांशी चर्चा केली, तसेच विनोद कांबळी यांच्या उपचारामध्ये कशाचीही कमतरता राहणार नाही याची काळजी घेण्यास देखील सांगितले. शिंदे फाउंडेशनच्या मदतीने कांबळीच्या उपचारांसाठी 5 लाख रुपये देण्यात आले. तसेच उपचारांसाठी अधिक पैशांची आवश्यकता असल्यास कांबळी यांना मदत केली जाईल असे देखील सांगण्यात आले आहे. पीटीआयशी बोलताना डॉ विवेक त्रिवेदी यांनी सांगितले की, 52 वर्षांचे विनोद कांबळी युरीन इंफेक्शनने त्रस्त आहेत. ज्यामुळे त्यांना शनिवारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात असलेल्या आकृती हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आले. जी डॉक्टरांची टीम विनोद कांबळीवर उपचार करतेय त्या टीमचे नेतृत्व डॉ. विवेक त्रिवेदी हे करत आहेत. 

हेही वाचा : मुंबईतील 'या' ठिकाणी आहे विनोद कांबळीचं आलिशान घर, किंमत ऐकून घाम फुटेल, पाहा Photos

 

डॉ. त्रिवेदींच्या नेतृत्वाखालील टीमनेच विनोद कांबळीच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या चाचण्या पार पडल्या. या चाचण्यांमध्ये विनोद कांबळीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या आहेत. डॉक्टरांची टीम विनोद कांबळीच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. मंगळवारीही विनोद कांबळीच्या काही वैद्यकीय चाचण्या झाल्या. इतकेच नाही तर डॉक्टर त्रिवेदी यांनी रुग्णालयाचे प्रमुख एस. सिंह यांनी आयुष्यभरासाठी कांबळीला मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. 

मागील काही वर्षांपासून प्रकृतीविषयक समस्या : 

52 वर्षीय विनोद कांबळीला त्याच्या एका चाहत्यानेच शनिवारी रुग्णालयात दाखल केलं. विनोद कांबळीला रुग्णालयात दाखल करणारा चाहता स्वत: एक डॉक्टर असून त्याचे भिवंडीमधील काल्हेरमध्ये रुग्णालयात आहे. विनोद कांबळीला मागील काही वर्षांपासून प्रकृतीसंदर्भात अनेक समस्या आहेत. 2013 मध्ये विनोद कांबळीच्या हृदयावर दोनदा शस्रक्रीया झाल्या. यासाठी त्याचा मित्र सचिन तेंडुलकरने त्याला आर्थिक मदत केली होती. 

विनोद कांबळी करिअर : 

विनोद कांबळी 9 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला, दरम्यान त्याने 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळला ज्यात त्याने एकूण 3500 हून अधिक धावा केल्या. बीसीसीआयकडून विनोद कांबळी याला 30 हजार रुपये महिना पेन्शन मिळते.