अहमदाबाद : इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा फलंदाज ईशान किशनने रविवारी पदार्पण करत उत्तम खेळी केली. ईशानने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत 28 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे तो सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याने 10व्या ओव्हरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूत पाठोपाठ सलग 2 षटकार आपल्या नावावर केले.
KISHAN 50 and what a way to get it! Magnificent. What a debut this is#INDvENG pic.twitter.com/xfcDRc2CGU
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) March 14, 2021
महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट विश्वात पदार्पण करत अर्थशतकी खेळी केली आहे. ईशानने 32 चेंडूत 56 धावांची शानदार अर्धशतकी खेळी साकारली. दुसऱ्या विकेटसाठी त्याने कर्णधार विराट कोहलीसह 94 धावांची भागिदरी केली.
Young man @ishankishan51 what a knock.. keep going youngster surely a great future ahead.. All the best #specialtalent #INDvENG
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 14, 2021
What a dream debut for @ishankishan51 absolutely fearless about his game ! That’s the beauty of playing ipl at a young age you just used to the atmosphere and you go and express your self ! !! And skipper is back with some class of his own !!@imVkohli #ENGvIND t20
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 14, 2021
यासोबतच ईशान टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक गाजवणारा भारतीय संघातला दुसरा क्रिकेटपटू ठराला आहे. रोहित शर्माने 2007 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरबनमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली. ईशानचं आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवाय भारतीय संघातल्या हरभजन सिंग आणि युवराज सिंगने देखली दखल घेतली आहे.