'MS Dhoni चांगला कॅप्टन होता, पण...',Yuvraj Singh ने दाखवला टीम इंडियाला आरसा!

Yuvraj Singh, World Cup 2023: रोहित शर्मा (Rohit Sharma) दडपणाखाली खूप समजूतदार कॅप्टन आहे. तुम्हाला अनुभवी कर्णधाराला एक चांगला संघ देण्याची गरज आहे, असं युवराज सिंग म्हणतो.

Updated: Aug 8, 2023, 06:18 PM IST
'MS Dhoni चांगला कॅप्टन होता, पण...',Yuvraj Singh ने दाखवला टीम इंडियाला आरसा! title=
Yuvraj Singh, Rohit Sharma, MS Dhoni,

Yuvraj Singh On Rohit Sharma: व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सर्वात टॅलेन्टेड खेळाडू म्हणजे युवराज सिंग (Yuvraj Singh). खेळात सातत्य, मोठ्या सामन्यात मैदानात टिकून खेळण्याची क्षमता आणि प्रेशर सामन्यात विजय खेचून आणण्याची ताकद असलेल्या युवराजने टीम इंडियाला एक नव्हे तर दोन दोन वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत. 2007 साली संघाला फायनलचं तिकीट मिळवून देण्याचं काम युवराजने केलं. तर 2011 चा वर्ल्ड कप युवराजच्या अफलातून कामगिरीमुळे भारताच्या पारड्यात पडला. विजयाचं श्रेय लाटण्यासाठी अनेक चर्चा झाल्या. मात्र, युवराज कधी त्या भानगडीत पडला नाही. तब्बल 18 वर्ष टीम इंडियामध्ये खेळणं म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नाही. अशातच वर्ल्ड कप विजेत्या युवराज सिंह याने सिलेक्टर्सला मोलाचा सल्ला दिला आहे. 

नेमकं काय म्हणाला युवराज?

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केल्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) आता चांगला कॅप्टन बनला आहे. तो टीम इंडियाचं चांगलं नेतृत्व करतोय. आता त्याला फक्त एका चांगल्या संघाची गरज आहे, एक असा संघ जो तगडा असेल. आम्ही धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप खेळला होता. धोनी एक चांगला कर्णधार होताच पण त्याचबरोबर आमचा संघ देखील तगडा होता हे विसरून चालणार नाही. आमच्याकडे चांगले अनुभवी खेळाडू होते. त्यामध्ये सचिन तेंडूलकर, गंभीर, विरेंद्र सेहवाग, झहीर खान, हरभजन सिंह या खेळाडूंचा समावेश होता, असं युवराज सिंग म्हणतो.

 सध्याच्या भारतीय संघात देखील मोठे खेळाडू आहेत. मोहम्मद शमी, केएल राहूल आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे हिस्सा होते. टीममध्ये असे अनेक खेळाडू आहेत. जे टीमला एकहाती विजय मिळवून देऊ शकतात, असंही युवराज सिंग म्हणतो. रोहित दडपणाखाली खूप समजूतदार कॅप्टन आहे. तुम्हाला अनुभवी कर्णधाराला एक चांगला संघ देण्याची गरज आहे, असं म्हणत युवीने (Yuvraj Singh On Rohit Sharma) सिलेक्टर्सला सल्ला दिला आहे.

आणखी वाचा - 'विराटला वर्ल्ड कप जिंकू द्यायचा नव्हता म्हणून...'; युवराज सिंहच्या वडिलांची धोनीवर सडकून टीका!

दरम्यान, मी भारतीय असलो तरी मी भारतच वर्ल्ड कप जिंकेल, असं म्हणू शकत नाही. त्यावरून मी फक्त देशभक्त आहे, हे सिद्ध होतंय. मात्र, तुम्हाला सत्य परिस्थिती पडताळून पहावी लागेल, असंही युवराज सिंह म्हणाला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. मात्र, अद्याप टीम इंडियाची घोषणा झाली नाही. टीम इंडियाचे 9 खेळाडू कोण असणार? यावर अद्याप चर्चाच सुरू असल्याचं पहायला मिळतंय.