नवी दिल्ली : कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करून टीम इंडियामध्ये परतलेला स्टार क्रिकेटर युवराज सिंगला त्याच्या खेळातील योगदानाबद्दल ग्वालियरच्या आयएमटी विश्वविद्यालयकडून बुधवारी डॉक्टरेट ही उपाधी बहाल करण्यात आली.
युवराजला हा सन्मान त्याच्या खेळातील कारर्कीदीबरोबरच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करून अनेकांना हुरुप देण्यासाठी प्रदान करण्यात आला.
युवराजशिवाय हा सन्मान डॉ. ए.एस किरण कुमार (अंतरिक्ष विज्ञान), गोविंद निहलानी (फिल्म), डॉ. अशोक वाजपेयी (कवि), रजत शर्मा ( मीडिया), डॉ. आर.ए माशेलकर (विज्ञान) आणि अरुणा राय (सामाजिक कार्य) यांना देण्यात आला.
युवराजने सांगितले की, डॉक्टरेट ही उपाधी घेऊन मला सम्मानित झाल्यासारखे वाटत आहे. त्याचबरोबर मला जबाबदारीची अधिक जाणीव होत आहे आणि माझ्या कार्याने मी इतरांसमोर उदाहरण ठेऊ इच्छितो.
युवराजने देशासाठी ४०० हुन अधिक आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. त्यात त्याने १०,००० हुन अधिक रन्स बनवले आहेत. त्याचबरोबर अंडर १९, टी20 विश्व कप २००७ आणि वनडे क्रिकेट विश्व कप २०११ जिंकण्यात त्याचा महत्त्वपुर्ण वाटा होता.