दुष्काळासाठी केंद्राची १२०७ कोटीची मदत जाहीर
राज्यातल्या दुष्काळाग्रस्तांसाठी १२०७ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत या पॅकेजची घोषणा केली.
Mar 13, 2013, 11:15 AM ISTदुष्काळग्रस्तांच्या समस्येवर तोडगा निघू शकेल?
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय. दुष्काळानं होरपळलेल्या जनतेचे, शेती करपून गेलेल्या शेतकऱ्यांसह अनेकांचे डोळे लागलेत ते याच अधिवेशनाकडे...
Mar 12, 2013, 05:08 PM ISTअर्थसंकल्पीय अधिवेशन दुष्काळावरून गाजणार
राज्याच्य़ा विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. अनेक विषयांमध्ये सरकार अपयशी ठरल्याचं भांडवल विरोधक करणार असल्यानं हे अधिवेशन वादळी ठरणार, हे स्पष्ट आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे.
Mar 11, 2013, 09:25 AM ISTसांगलीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या?
दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात शेतक-याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. बोरगी गावातील विजयकुमार बरडोल या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.
Mar 10, 2013, 04:57 PM IST‘योजनांचा सुकाळ, राज्यात मात्र दुष्काळ’
दुष्काळावर राज्यसभेत उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारी योजनांवर खापर फोडलंय.
Mar 8, 2013, 02:05 PM ISTदुष्काळग्रस्त भागांना मनसेची मदत
दुष्काळग्रस्त भागात तातडीने चारा छावण्या उभारण्याचे आदेश, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिले आहेत. औरंगाबाद,. जालना, बीड, सोलापूरमध्ये दुष्काळग्रस्त भागात तातडीने मदत यंत्रणा कार्यरत होणार आहे.
Mar 6, 2013, 09:46 PM ISTविहिरींना पाणी न लागल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
महाराष्ट्रात भीषण दुष्काळ जाणवत आहे. या दुष्काळाला नागरिक त्रस्त झाले आहेत. हा दुष्काळ आता जीवावर उठला आहे. पाणी नसल्याने दोन विहिरी खोदूनही पाणी न लागल्यानं निराश झालेल्या औरंगाबादेतल्या एका शेतक-यानं आत्महत्या केलीये.
Mar 6, 2013, 12:27 PM ISTमराठवाड्यात दुष्काळ, आश्वासनांचा पाऊस
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना, आश्वासानांचा मात्र पाऊस पडताना दिसतोय. गेल्या महिनाभरात शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत सर्वच सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठवाड्याचा दौरा केलाय. मात्र या दौ-यांत दुष्काळग्रस्तांना पदरात पडलीय फक्त निराशाच....
Mar 5, 2013, 06:28 PM ISTदुष्काळग्रस्त गावात आनंदाचे झरे!
मावळच्या कुशीत वडेश्वरच्या डोंगरावर विसावलेली सटवाईवाडी. पावसाळ्याचे दिवस वगळता आठही महिने पाचवीला पुजलेली पाणीटंचाई... पण आज या गावचं चित्र पालटलय. टाटा मोटर्सच्या सुमंत मुळगावकर फौंडेशनने वर्षभरापूर्वी एका जिवंत झ-याचा आधार घेत तळे खोदायला सुरुवात केली. गावक-यांनीही श्रमदान केले. अन् बघता बघता तळे उभे राहिले…
Mar 4, 2013, 12:22 AM ISTछगन भुजबळ दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर
दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी आलेल्या छगन भुजबळांनी अधिका-यांना चांगलंच धारेवर धरलं...यावेळी त्यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचाही प्रयत्न केला..
Mar 3, 2013, 11:50 PM ISTपवार साहेब दुष्काळ आहे IPLच्या मॅचेस बंद करा- राज
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. शरद पवार कायम पोरकट म्हणून मला हिणवतात म्हणून त्यांच्यासाठी काही पोरकट प्रश्न मी आणले आहेत.
Mar 3, 2013, 12:14 AM ISTदुष्काळावर राष्ट्रवादी काँग्रेसची बनवाबनवी
दुष्काळग्रस्तांना मदत उभारण्यासाठी राष्ट्रवादी दुष्काळग्रस्त सहायता अभियान सुरू केलंय. यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पुस्तिकेत छापण्यात आलेली दुष्काळग्रस्तांची छायाचित्रे आफ्रिकेतल्या देशांमधील वापरण्यात आल्याचं उघड झालंय.
Feb 25, 2013, 11:57 PM ISTराष्ट्रवादीचे हसे, पवारांचे ऐकतोय कोण?
चक्क शरद पवारांचे आदेश धाब्यावर बसविले गेलेत. त्यामुळे शरद पवारांचे ऐकतो कोण? राष्ट्रवादीचे बोटचेपे धोरण. चारा छावणी जनावरांची न राहतात ती माणसांचीच झालीय, हे तेथील दृश्यांवरून दिसून येत आहे. भर उन्हात जनावरांबरोबरच माणसांची फरपट होत आहे. देशाचे कृषीमंत्री यांच्याच मतदार संघात दुष्काळ आहे. त्याकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही, असे येथे पाहिल्यावर दिसते. पवारांनी एका दिवसाचा पगार दुष्काळांसाठी दिला, तो पुरतो का?
Feb 24, 2013, 02:52 PM ISTसांगली महापौरांच्या घरावर आयकरचे छापे
राज्यात दुष्काळ असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाही थाटात लग्नाचा बार उवून दिला. या थाट राष्ट्रवादीच्या मंत्र्याना आणि महापौरांना चांगलाच महागात पडलाय. तर एका कंत्राटदारालाही शाही विवाह अडचणीचा ठरलाय. या सर्वांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली.
Feb 20, 2013, 04:21 PM ISTदाणापाण्याचा घोर, स्थलांतर करती मोर
अवघा महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतोय. सगळीकडं पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील मोराच्या चिंचोलीची परिस्थितीही वेगळी नाही. पाण्याच्या दूर्भिक्षामुळं इथल्या मोरांवरही स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे.
Feb 18, 2013, 05:55 PM IST