शेतकरी

शेतकरी कर्जमाफी आणि बुलेट ट्रेन फसवी, शरद पवारांचा आंदोलनाचा एल्गार

केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे. तसेच जपानची आर्थिक मंदी दूर करण्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे, अशी टीका करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आम्ही दिवाळीपर्यंत वाट पाहत आहेत. त्यानंतर आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा पवार यांनी दिलाय.

Oct 3, 2017, 03:37 PM IST

'त्या' शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना २ लाख रूपयांची मदत

शेतातील पिकावर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने २ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

Oct 3, 2017, 02:58 PM IST

शेतकऱ्यांना विषबाधा : ...तर अधिकारी आणि मंत्रालयात किटकनाशक फवारणी - बच्च कडू

पिकांवर औषधांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना १५ दिवसांत तात्काळ मदत केली नाही तर  अधिकारी आणि मंत्र्यांच्या कार्यालयात किटकनाशकांची फवारणी करु, असा गंभीर इशारा कडू यांनी दिलाय.

Oct 3, 2017, 08:58 AM IST

औषधांची फवारणी करताना सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा सुस्त कारभार सुरु असल्याने पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे.

Oct 2, 2017, 10:36 PM IST

या सरकारच्या काळात देव सुखी, मात्र माणसे नाही - राजू शेट्टी

देवधर्मासाठी सरकारकडे निधी आहे, परंतु, माणसांसाठी नाही, शासनाच्या तिजोरीतील ४० हजार कोटी रुपये या सरकारने देवधर्मासाठी खर्च केले. या सरकारच्या काळात देव सुखी आहे पण माणसे नाहीत, असा घणाघाती हल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर केलाय.

Sep 27, 2017, 07:44 AM IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली

शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली आहे. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जाची माहिती दिली नसल्याने सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि त्यामुळंच ही प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Sep 27, 2017, 07:37 AM IST

पाच वर्षानंतरही मोबदला न मिळाल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

बदलापूर - वांगणी राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करीत असताना या भागातील शेतकऱ्यांची भूसंपादन करून पाच वर्ष झाली. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे या भूसंपादन प्रक्रियेत फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांची झाली असून मोबदल्यापासून वंचित असलेले शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

Sep 24, 2017, 04:43 PM IST