सावधान! इतरांचं घर अडवून बसाल तर...
भाडेकरू आणि घरमालक असा वाद आपण नेहमीच ऐकतो. पण हेकेखोरपणानं घर खाली न करून अंधेरी (पू.) इथल्या एका मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीची योजना गेली पाच वर्षे रखडवून ठेवणाऱ्या दोन भाडेकरूंना अटक करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय.
Nov 4, 2014, 10:09 AM ISTनवा ट्रेंड: वार्षिक वेतनाऐवजी चार वर्षांच्या ‘पॅकेज’ची ऑफर
प्रोबेशनवर ठेवताना कर्मचार्यांवना बोनस, कंत्राट संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी निधी अशा सवलती देऊन नामवंत कंपन्या तरुण इंजिनीयर्सना आपल्याकडे आकर्षित करतात. आता त्यात आणखी एका नव्या ट्रेंडची भर पडली आहे. वार्षिक वेतनावर नेमणूक करण्याऐवजी ३-४ वर्षांचं ‘पॅकेज’ दिलं जाऊ लागलं आहे.
Nov 4, 2014, 09:19 AM ISTतामिळनाडूत काँग्रेसला धक्का, वासन यांचा राजीनामा, स्वत:चा पक्ष काढणार
तामिळनाडूतील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जी.के. वासन यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. वासन यांनी पक्ष सोडल्यानं तामिळनाडूमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वासन हे तामिळनाडूतील दिवंगत काँग्रेस नेते जी. के. मोपनार यांचे पुत्र आहे.
Nov 3, 2014, 03:11 PM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतलं गुरूजींच्या स्मृतिस्थळाचं दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 02:16 PM ISTखडसे नाराज नाहीत, मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 02:16 PM ISTवेश्यावृत्तीच्या व्यवसायात यायला माझ्यावर दबाव नव्हता- श्वेता प्रसाद
नॅशनल अॅवॉर्ड विजेती अभिनेत्री श्वेता बसू प्रसादनं आमचं सहकारी वृत्तपत्र डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय, की तिच्यावर वेश्याव्यवसायात उतरण्यासाठी कोणीही दबाव टाकला नव्हता. सेक्स रॅकेटमध्ये पकडल्या गेल्याच्या दोन महिन्यांनतर रेस्क्यू होममधून सुटलेल्या श्वेतानं पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिलाय.
Nov 3, 2014, 02:05 PM ISTमनसेला जोरदार धक्का, अनेक नेते आणि नगरसेवकांचा राजीनामा
राज ठाकरेंच्या मनसेला चांगलीच खिंडार पडण्याची शक्यता आहे. नाशिकमधील त्यांची सत्ताही आता जाते की राहते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीय. नाशिकचे माजी आमदार अनंत गीते यांनी मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.
Nov 3, 2014, 01:18 PM ISTव्यंग असलेल्या अर्भकाचा जन्म रोखणं आता शक्य!
व्यंग अर्भकाचं पोषण करणं हे अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचं दिव्य ठरतं. त्यात गर्भातच अर्भकाला व्यंग असल्याचं कळल्यानंतरही गर्भपात करता येत नाही. सध्याच्या कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्यास कायद्याची संमती आहे. पण ही मर्यादा आता तब्बल ४ आठवड्यांनी वाढवून २४ आठवड्यांपर्यंत करण्याचा मसुदा केंद्रीय आरोग्य मंत्रिमंडळानं बनवला आहे. देशभरातील अनेक कुटुंबांना त्यामुळं दिलासा मिळणार आहे.
Nov 3, 2014, 12:43 PM ISTतरुणीला १ वर्षाचा तुरुंगवास का... तर मॅच पाहिली म्हणून
पुरुषांची व्हॉलिबॉलची मॅच बघितल्यानं तेहरानमध्ये एका ब्रिटीश वंशाच्या तरुणीला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त असून ब्रिटननंही त्या तरुणीला तुरुंगातून मुक्त करण्याची मागणी इराणकडे केली आहे.
Nov 3, 2014, 12:22 PM ISTगुड न्यूज: डेंग्यूवरील लशीची भारतातील चाचणी यशस्वी
महाराष्ट्रासह देशभरात डेंग्यू वेगानं फैलावत असतानाच फ्रान्समधील सॅनोफी पाश्चर या औषध कंपनीनं तयार केलेली डेंग्यूवरील लशीची भारतावरील चाचणी यशस्वी ठरली आहे. त्यामुळं पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतातही उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.
Nov 3, 2014, 12:05 PM ISTअमरापूरकर मराठीचा अभिमान होते- महेश कोठारे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 11:12 AM IST'सत्तेत सहभागी होण्याची आम्हाला घाई नाही' - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 11:05 AM ISTशिवसेना सीमाबांधवांसोबत - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 11:03 AM ISTफोटो: सदाशिव अमरापूरकरांचा जीवनप्रवास
Nov 3, 2014, 10:29 AM ISTभारतात WhatsApp चे ७ कोटींहून अधिक युजर्स
भारतात व्हॉट्स अॅपच्या सक्रीय युजर्सची संख्या वाढून सात कोटींच्या वर पोहोचली आहे. ही संख्या व्हॉट्स अॅपच्या एकूण युजर्सच्या १० टक्क्यांहून अधिक आहे. व्हॉट्य अॅपचे भारतातील बिझनेज प्रमुख नीरज अरोडा यांनी दिलीय.
Nov 3, 2014, 09:35 AM IST