24taas

पहिल्यांदा सांगलीच्या मंत्रीविनाच सरकारचा शपथविधी

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील महत्वाचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून, आजपर्यंत प्रत्येक मंत्रिमंडळात सांगलीचं प्रतिनिधित्व होतं. राज्यात भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण दहा मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र सांगलीचा मंत्री नसणारा हा पहिलाच शपथविधी ठरलाय.  

Nov 1, 2014, 03:40 PM IST

जीवे मारण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर बलात्कार

जीवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये घडली. याप्रकरणी ३५ वर्षीय नराधम सादी इमाम हुसेन लाडखान याला इचलकरंजी पोलिसांनी अटक केलीय. 

Nov 1, 2014, 02:36 PM IST

अखेर हृतिक-सुझानच्या घटस्फोटावर वांद्रे कोर्टाकडून शिक्कामोर्तब

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानच्या घटस्फोटाला वांद्रे कोर्टानं कायदेशीर मान्यता दिलीय. दोन मुलांच्या ताब्याबाबत आता सुनावणी सुरू आहे. अखेर त्यांचं १४ वर्षांचं नातं कायदेशीरपणे संपुष्टात आलंय.

Nov 1, 2014, 01:29 PM IST

खडसेंना विठोबा पावला, कार्तिकी एकादशीला करणार विठूरायाची पूजा

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं करण्यात येणाऱ्या विठ्ठलाच्या पूजेचा मान नवनिर्वाचित मंत्री एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा आणि आरती करतात. 

Nov 1, 2014, 12:48 PM IST

सीमाभागात आज काळा दिवस, निपाणी बंदची हाक

राज्य पुनर्रचनेच्यावेळी बेळगांवसह सीमाभागातील ८६५ खेडी अन्यायानं १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्यात डांबण्यात आली. या अन्यायाच्या निषेधार्थ संपूर्ण सीमाभागात आज काळा दिवस पाळला जातो. 

Nov 1, 2014, 11:30 AM IST