24taas

शिवसेना विरोधी पक्षात बसणार- सूत्र

शिवसेना-भाजप युती संदर्भात चर्चा सुरू असतांनाच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार नाहीय. त्यांनी विरोधी बाकावर बसण्याचं निश्चित केल्याचं समजतंय. 

Nov 5, 2014, 11:01 AM IST

विवाह इच्छुकांसाठी: यावर्षी विवाहासाठी साठ मुहूर्त!

कार्तिकी एकादशीनंतर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत मुहूर्त साधत सध्या ठिकठिकाणी तुळशी विवाह होत आहेत. तुळशी विवाहानंतर २६ नोव्हेंबरपासून उपवर मुलामुलींचे विवाह सुरू होतील. यंदा अधिक मासामुळं विवाह मुहूर्तात घट आली आहे. सरासरी साठ विवाह मुहूर्त असून पालकांना सोयीनुसार घटीका आणि गोरज मुहूर्तावर विवाह करता येतील. त्यामुळं सध्या कुंडली लक्षात घेऊन पालक ब्राह्मणांकडे योग्य मुहूर्त शोधू लागले आहेत.

Nov 5, 2014, 10:10 AM IST

शोकाकुल वातावरणात सदाशिव अमरापूरकरांना अखेरचा निरोप

सिने-चित्रपटसृष्टीचे चतुरस्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

Nov 5, 2014, 09:52 AM IST

खूशखबर... सोने डिसेंबरपर्यंत २५ हजारांवर!

तुळशीच्या विवाहानंतर लग्नाचा मौसम सुरू होईल. त्यामुळं मुहूर्तांसाठी वधुपित्यांची घाई सुरू झाली आहे. त्यातच धनत्रयोदशीनंतर सोन्याचे भाव हळूहळू घसरू लागल्यामुळं सर्वांनी आतापासूनच सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान डिसेंबरपर्यंत सोन्याचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत खाली येतील, असं अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळं यंदा लग्नाचे बार आता दणक्यात उडणार आहेत.

Nov 5, 2014, 09:21 AM IST

कोलकात्यात रेडअलर्ट: दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

कोलकात्यात दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यामुळं रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळं कोलकाता बंदर भागात सुरक्षा व्यवस्था अधिक प्रमाणात वाढविण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर जनतेला नौदलाच्या दोन युद्धनौका पाहण्यासाठी तीन दिवस बंदी घालण्यात आली असून गोदी भागातही लोकांना जाण्यापासून रोखलं जात आहे.

Nov 5, 2014, 09:05 AM IST

तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक अहवालातील सत्य

जवखेडा तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक विभागानं दिलेल्या अहवालातली माहिती 'झी २४ तास'कडे आलीय. त्यानुसार संजय आणि जयश्री जाधव यांची हत्या गळा दाबून करण्यात आलीय. तर सुनील जाधव याचा गळा चिरून खून करण्यात आला.

Nov 4, 2014, 03:47 PM IST

श्वेतपत्रिकेतून सत्य बाहेर येईल- अजित पवार

अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढायला माझी काहीही हरकत नाही. त्यामुळं सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलीय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात वित्त विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचे संकेत दिले होते यावर अजित पवार यांनी हे मत व्यक्त केलंय. 

Nov 4, 2014, 01:34 PM IST

वर्ल्डकप विजेत्या टीममधील खेळाडूचा बुकींशी संबंध - मुदगल समिती

वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे बुकी आणि फिक्सिंग करणाऱ्यांशी संबंध होते असा गौप्यस्फोट आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीनं सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर सादर केलेल्या अहवालात केला आहे. या खेळाडूचं नावं अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसून या अहवालाविषयी १० नोव्हेंबररोजी होणाऱ्या सुनावणीत हे नाव समोर येण्याची चिन्हं आहेत. 

Nov 4, 2014, 12:07 PM IST

अॅप... आपल्या मृत्यूची तारीख सांगणारं अॅप बाजारात!

आपल्याला माहितीय की आपली आयुष्याचे दिवस कधी भरणार आहेत. आता एक अॅप आलंय ज्याचं नाव ‘डेडलाइन’ आहे. हे अॅप आपल्या आयफोनच्या हेल्थकिट टूलचं विश्लेषण करून हे सांगू शकेल की, तुम्ही किती दिवस जगणार... 

Nov 4, 2014, 11:14 AM IST

आश्चर्य: जगणे म्हणजे तारेवरची जगण्याची कसरत...

अमेरिकेतील निक वालेंदा (३५) या तरुणानं दोन गगनचुंबी इमारतीवरुन डोळे बांधून सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता चालण्याचा विक्रम केला असून, त्याचं हे साहस आणि थरार पाहण्यास हजारो लोक जमले होते. 

Nov 4, 2014, 10:35 AM IST