assembly 2014

भ्रष्ट नेत्यांना भाजपनं दिला प्रवेश - रामदास कदम

भ्रष्ट नेत्यांना भाजपनं दिला प्रवेश - रामदास कदम

Oct 3, 2014, 09:30 AM IST

महाराष्ट्रातील दिग्गजांच्या आजच्या सभा

महाराष्ट्रातील दिग्गजांच्या आजच्या सभा

Oct 3, 2014, 09:29 AM IST

जनतेचा कौल भाजपच्या पारड्यात, झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष

महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल सध्या भाजपच्या पारड्यात टाकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ९० जागा मिळतील, असा निष्कर्ष 'झी २४ तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये पुढं आलाय.

Oct 2, 2014, 11:11 PM IST

शुभा राऊळ यांच्या उमेदवारीचा फायदा-तोटा कुणाला?

शिवसेनेने आमदार विनोद घोसाळकर यांना पुन्हा संधी दिल्यामुळे, नाराज झालेल्या शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेत प्रवेश केला आणि दहिसरमधून उमेदवारी अर्जही दाखल केला. राऊळ यांच्या मनसे प्रवेशामुळे दहिसर मतदारसंघाची समीकरणं बदलली आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दहिसरला मोठे भगदाड पडले आहे. 

Oct 2, 2014, 09:54 PM IST

दमदार ब्लू प्रिंटनंतर, आता मनसेचं प्रचारगीत प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खास प्रचारगीत तयार केलंय. या प्रचारगीताचं अनावरण आज शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे आदींच्या उपस्थितीत कोहिनूर हॉटेलमध्ये झालं.

Oct 2, 2014, 07:58 PM IST

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, आश्वासनांची खैरात!

महाराष्ट्रातला रणसंग्राम रंगतदार अवस्थेत असताना आज राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचाही जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. राज्यातल्या नववी पास असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना टॅब देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. 

Oct 2, 2014, 07:29 PM IST

कुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचं आव्हान

कुडाळ-विधानसभा निवडणूक २०१४ मधील कुडाळ मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होणार आहे, असं म्हटलं जात होतं, मात्र तो सामना फक्त दोन उमेदवारात रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Oct 2, 2014, 07:28 PM IST

शिवसेनेकडून खडसेंना मतदारसंघातच कडवे आव्हान

 भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिलेले खुले आव्हान, स्थानिक शिवसेनेचा अंतर्गत विरोध व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी द्यावी लागणारी झुंज या पार्श्वभूमीवर खडसे यांना यंदा कडवी लढत द्यावी लागू शकते. विशेष म्हणजे मतदारसंघशतील मराठा आणि लेवा पाटील समाजातील सुप्त वादही त्यांची वाट अवघड बनू शकते. 

Oct 2, 2014, 06:28 PM IST

तुरूंगात निवडणूक लढवतायत सुरेश जैन

जळगावमध्ये सलग ३० वर्षे आमदार असलेले सुरेश जैन यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही. घरकूल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन सध्या धुळ्याच्या तुरूंगात आहेत. तुरूंगात राहून निवडणूक जिंकणे हे मोठं आवाहन सुरेश जैन यांच्यासमोर आहे.

सुरेश जैन यांनी मात्र या आधी जळगाव महापालिकेत खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता राखली आहे. मात्र जिल्हा बँकेत सत्ता राखण्यात सुरेश जैन यांना यश आलेलं नाही.

Oct 2, 2014, 04:58 PM IST

पंकजा.... गोपीनाथ मुंडेंची छबी!

‘मी गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा... त्यांची छबी’ असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यंदा दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरतायत... महत्त्वाचं म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर बीड मतदार संघातून निवडणूक लढवून केंद्रात जाण्याची मिळणारी संधी बाजुला सारून पंकजा यांनी विधानसभेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. तर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीद्वारे पंकजाची लहान बहिण प्रीतम मुंडे – खाडे आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करत आहेत.

Oct 2, 2014, 04:45 PM IST