assembly 2014

भाजपनं बाळासाहेबांच्या आशिर्वादाचा विश्वासघात केला - उद्धव ठाकरे

गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली युती तोडत भाजपनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाचा विश्वासघात केल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपला १३४ जागा द्यायला शिवसेना नामर्द आहे का? असा सवाल विचारत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फलटणमधील प्रचारसभेत ते बोलत होते. 

Oct 2, 2014, 04:37 PM IST

छगन भुजबळांचा राजकीय प्रवास

येवला मतदारसंघात छगन भुजबळ आणि शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यात सरळ लढत होत असून, पवारांनी भुजबळांसमोर तगडे आव्हान उभे केल्याने त्यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Oct 2, 2014, 04:33 PM IST

'शिवाजी महाराजांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही'

शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही. महाराजांना सुरतचा लुटारू म्हणणाऱ्या भाजपाला आज मतांसाठी महाराज दिसत आहेत, अशी टीका करत केंद्रातील भाजप सरकारने कांदा जीवनावश्यक करून सरकारने शेतकऱ्यांना  मारण्याच काम केले आहे, असे प्रतिपाद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.  त्यांनी  नेवासे विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. 

Oct 2, 2014, 04:00 PM IST

राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध, २० रुपयांत चांगले जेवण

राज्यात शेतकरी, पोलीस, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी कठिबद्ध आहे. त्यांना चांगल्या सोयी सुविधा देण्यावर आपला भर आहे. आम्ही दिलेली आश्वासने पाच वर्षांत पूर्ण केली जातील, असे ठोस आश्वासन प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Oct 2, 2014, 03:37 PM IST

राज ठाकरेंचे नाव ऐकल्यावर मला रडू आलं - आठवले

मुख्यमंत्रीपदासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव ऐकल्यावर मला रडू आलं अशी उपहासात्मक  टीका आठवलेंनी राज ठाकरेंवर केली आहे. 

Oct 2, 2014, 02:10 PM IST

'आबा' सलग सहाव्यांदा निवडून येणार की राजकारण सोडणार?

रावसाहेब रामराव पाटील हे नाव कदाचित तुम्हाला अनोळखी वाटू शकेल... पण, 'आबा' असं म्हटलं की तुम्हाला लगेचच समजेल की आपण मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबद्दल बोलत आहोत. 

Oct 2, 2014, 02:02 PM IST

मी पाडापाडीचं राजकारण करत नाही - उद्धव ठाकरे

 शिवसेना-भाजप युती तोडण्यासाठी भाजपचे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांचा हात असल्याची चर्चा रंगत आहे. यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या, असा सेनेचा आदेश अल्याचे बोलले जात होते. मात्र, मी पाडापाडीचं राजकारण करत नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेत.

Oct 2, 2014, 01:55 PM IST

राजू शेट्टींवर शिवसेनेचा 'सामना'तून हल्लाबोल

शिवसेनेने एकामागून आपल्या जुन्या मित्र पक्षांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आधी आठवले, काल जानकर आणि आज राजू शेट्टीवर शिवसेनेनं हल्लाबोल केला आहे. 

Oct 2, 2014, 01:23 PM IST

'शेतकऱ्यांचा स्वाभिमान' राजू शेट्टी राखणार?

 राजू शेट्टी यांचं  नाव एव्हाना महाराष्ट्राच्या खेड्यानपाड्यांत पोहचलंय. कांद्याला योग्य भाव मिळवून देणं असो किंवा ऊसतोडणी कामगारांचा लढा... राजू शेट्टींचा 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' नावाचा पक्ष हक्कानं शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलेला महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलाय... त्यामुळेच हा महाराष्ट्रही लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मागे भरभक्कमपणे उभा राहिलात. आता, विधानसभा निवडणुकीतही राजू शेट्टी नावाचा दबदबा दिसून येतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Oct 2, 2014, 01:05 PM IST

शिवसेना रत्नागिरी मतदारसंघ करणार काबीज!

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. तर गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात भाजपाचे बाळ माने उभे ठाकले आहेत.

Oct 2, 2014, 12:52 PM IST

पुण्यात निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी महिलांवर

राजकीय पक्ष निवडणूक लढवत असले तरी, निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचारी निवडणूक पार पाडण्यासाठी झटत असतात. यात प्रामुख्याने पुरुष अधिकारी आणि कर्मचा-यांचं वर्चस्व दिसतं. पुण्यात मात्र याच्या विरुद्ध चित्र पाहायला मिळतंय. निवडणुकीची अवघड आणि जबाबदारीची कामगिरी पुण्यात महिला अधिका-यांच्या खांद्यावर आहे. 

Oct 2, 2014, 11:55 AM IST

मागाठणेत मनसेच्या अस्तित्वाची लढाई, सेना-काँग्रेसने कंबर कसली

मागठाणे मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळतेय. मनसेच्या प्रवीण दरेकरांसाठी ही अस्तित्वाची लढाई असेल. त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसनं जोरदार तयारी केलीय. तिन्ही पक्षांनी मराठी उमेदवार दिले असले तरी उत्तर भारतीय मतदारांची भूमिकाही इथं महत्वाची ठरणार आहे.

Oct 2, 2014, 11:09 AM IST

पाहा, आज कुणत्या नेत्याच्या कुठे आहेत सभा...

पाहा, आज कुणत्या नेत्याच्या कुठे आहेत सभा...

Oct 2, 2014, 10:43 AM IST

महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा... धोरणात्मक पथदर्शिका

महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा... धोरणात्मक पथदर्शिका

Oct 2, 2014, 10:03 AM IST

शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर डोळा - खडसे, तावडे

युती तुटण्यास आपण जबाबदार नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर डोळा होता म्हणूनच युती तुटली, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तर दुसरीकडे विनोद तावडेंनी उद्धव ठाकरेंच्या नावामुळेच युती तुटल्याचे म्हटले आहे.

Oct 2, 2014, 09:14 AM IST