फेसबुकने दिलं एक कोटी ३४ लाखांचे पॅकेज
सोशल नेटवर्किंगमधली जागतिक स्तरावरील बलाढ्य कंपनी फेसबुकने एका अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याला एक कोटी ३४ लाख रुपयांचे पॅकेज दिलं आहे. देशात आजवर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एव्हढ्या प्रचंड रकमेचं पॅकेज देण्यात आलं नव्हतं.
Mar 29, 2012, 07:28 PM ISTफेसबुकवर चॅट करताना महिलेची आत्महत्या
तैवानमध्ये एका महिलेने आपल्या मित्रमंडळीशी फेसबुकवर चॅट करत असताना विषारी द्राव ओढत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या महिलेच्या मित्रमंडळींनी पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही.क्लेअर लिनने आपल्या ३१व्या वाढदिवसाच्या दिवशी १८ मार्चला आत्महत्या केली. क्लेअर लिनच्या कुटुंबातील सदस्यांना तिच्या फेसबुकवरील संभाषणाविषयी कोणतही कल्पना नसल्याचे तैपईचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Mar 28, 2012, 10:25 AM ISTफेसबुकचा कायदेशीर कारवाईचा इशारा
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडून सोशल नेटवर्किंग पासवर्डची मागणी करणाऱया कंपन्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा फेसबुकने दिला आहे. फेसबुकच्या म्हणण्यानुसार अशा स्वरुपाचा आग्रह धरणं हे त्यांच्या सेवेच्या विरुद्द आहे.
Mar 26, 2012, 05:32 PM ISTफेसबुकवर 'चुतियां'ची लागली वाट
तुम्ही चुतिया असलात तर तुमचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक केलं जाण्याची शक्यता आहे. हिंदी भाषेत चुतिया हा शब्द शिवी म्हणून वापरला जातो त्यामुळे फेसबुकने हे पाऊल उचललं आहे.
Mar 15, 2012, 09:46 PM ISTसोशल मीडिया मुक्त - सिब्बल
इंटरनेट जगतातील सोशल मिडियावर सेन्सॉर लावण्याची सरकारची योजना नसल्याची माहिती केंद्रीय टेलिकॉम आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी आज मंगळवारी दिली.
Feb 15, 2012, 03:32 PM ISTआक्षेपार्ह मजकूर हटवला – फेसबूक-गुगलचा दावा
आक्षेपार्ह ठरविलेला मजकूर आम्ही काढून टाकल्याचे फेसबुक-गुगलसह २१ वेबसाइटने कोर्टाला कळविले आहे. फेसबुक आणि गुगलसह इतर वेबसाइटला आक्षेपार्ह मजकुरासाठी कोर्टाने नोटीस पाठवली होती. त्याला या कंपन्यांनी उत्तर दिले आहे.
Feb 6, 2012, 04:19 PM ISTसोशल नेटवर्किंगवर नो प्रचार
फेसबुक, यू ट्युब, ट्विटर सोशल नेटवर्किंग साईटस्वर प्रचारासंदर्भात मजकूर किंवा माहिती अपलोड राजकीय नेत्यांना करता येणार नाही. जर करावयाची असेल तर राजकीय पक्षांनी आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केले आहे.
Jan 27, 2012, 10:12 PM ISTवेबसाईटवर नियंत्रण अशक्य- गुगल
गुगल इंडिया आणि फोसबुक इंडियाने सोमवारी दिल्ली हायकोर्टाला पुन्हा एकदा सांगितलं की अब्जावधी लोक वेबसाईट वापरत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने अपलोडिंग सुरू असताना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं, ती नियंत्रणात ठेवणं अशक्य आहे.
Jan 17, 2012, 01:09 PM ISTटाईमलाईन फेसबुक
सोशलनेट साईटवर तुम्हाला आता फेसबुकने अधिक स्मार्ट बनविले आहे. आपली प्रोफाईल छान दिसणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला टाईमलाईन पाळावी लागेल. म्हणजेच फेसबुकच्या तुमच्या प्रोफाईलला ‘टाईमलाईन’ टॅग करावे लागेल. ‘टाईमलाईन’ टॅग केला की मग पहा, तुमची प्रोफाईल हायटेक दिसेल आणि तुम्ही फेसबुकच्या प्रेमात पडाल.
Jan 5, 2012, 11:44 AM ISTघटस्फोटाचे कारण 'फेसबुक'
युनायटेड किंग्डममध्ये मागील वर्षात घटस्फोटांचे प्रमुख कारण फेसबूक असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरातील एक तृतियांश घटस्फोट फेसबूकमुळे झाले असं सांगण्यात येत आहे. तसंच घटस्फोटांच्या खटल्यांमध्ये फेसबूकचा पुरावा म्हणून उपयोग करण्यात येत आहे
Jan 1, 2012, 11:58 PM ISTकाँग्रेसने केली फेसबुक, ऑर्कुट पोस्टर्सची होळी
सोशल नेटवर्किंग साईट्सबाबत सरकार दरबारी वाद धुमसत असतानाच त्याचे पडसाद इतरत्रही उमटू लागलेत. ठाण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक, ऑर्कुटच्या पोस्टर्सची होळी केली.
Dec 7, 2011, 06:03 AM ISTगुगल, याहू, फेसबुकला केंद्राची सक्त ताकीद
गुगल, याहू, फेसबुक या साईट्सना केंद्र सरकारने फैलावर घेतले आहे. अक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकण्यावर जोरदार हरकत घेतली आहे.
Dec 6, 2011, 07:33 AM ISTफ्रेंडशीप, जरा जपूनच !
फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करताना जरा जपून करा. कारण त्या माध्यमातून सायबर अॅटॅक होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ट्रोजनचा वापर करून अशाप्रकारचे सायबर अॅटॅक केले जात असल्याचे एका आयटी कंपनीने नुकतेच स्पष्ट केले.
Oct 21, 2011, 10:54 AM IST